शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढ व आरोग्यदायी राहून हृदयविकाराला ठेवा दूर

By admin | Updated: September 24, 2015 01:57 IST

आयुष्यात व्यक्तीला विविध आजारांना बळी पडावे लागते. काही आजार संसर्गजन्य असतात तर काही आजार व्यक्ती स्वत: त्याच्या स्वभाव गुणधर्मानुसार तसेच सवयीनुसार,...

हृदयविकार जागरूकता दिन : १५ टक्के लोकसंख्या आजारग्रस्तगडचिरोली : आयुष्यात व्यक्तीला विविध आजारांना बळी पडावे लागते. काही आजार संसर्गजन्य असतात तर काही आजार व्यक्ती स्वत: त्याच्या स्वभाव गुणधर्मानुसार तसेच सवयीनुसार, व्यसनानुसार ओढवून घेत असतो. विविध आजारांपैकी हृदयरोगही यापैकीच एक आजार आहे. जो व्यक्तीला त्याच्या खानपान, सवयी, मानसिक संतुलन यानुसार जडत असतो. एकूण लोकसंख्येच्या १० ते १५ टक्के लोकांना हृदयविकार आजार जडत असतो. मात्र या आजारावर योग्य नियंत्रण ठेवण्याकरिता उपाययोजना केल्यास आजाराला दूर ठेवता येते.हृदयविकार आजार लहान मुलांना जन्मताच झाल्यास आजारावर उपचार म्हणून शस्त्रक्रियेशिवाय पयार्य नसतो. तसेच वयाच्या २५ वर्षानंतर हृदयविकार झाल्यास विविध औषधांचे सेवन केल्यास आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मानसिक ताणतणाव, धूम्रपान, कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीने याबाबीपासून दूर राहावे. वयाच्या २५ वर्षानंतर होणाऱ्या हृदयविकाराचे प्रमाण नागरिकांमध्ये १० ते १५ टक्के असते. तसेच जन्मत: लहान मुलांना आजार होण्याचे प्रमाण १ ते २ टक्के असते. विशेषत: हृदयविकार वयाच्या २५ वर्षानंतर सार्वधिक प्रमाणात होत असल्याचे रूग्णांच्या संख्येवरून दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १० ते १५ टक्के लोकसंख्या हृदयविकाराने ग्रस्त आहे.