रसायनयुक्त फळांपासून राहा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:20+5:302021-01-09T04:30:20+5:30

कार्बाइडने पिकविलेली फळे आरोग्यास अपायकारक असल्याने १९७९ च्या प्रिव्हेन्शन ऑफ फुड अडल्ट रेशन अ‍ॅक्ट तयार करून त्यात कलम ४४ ...

Stay away from chemical fruits | रसायनयुक्त फळांपासून राहा दूर

रसायनयुक्त फळांपासून राहा दूर

कार्बाइडने पिकविलेली फळे आरोग्यास अपायकारक असल्याने १९७९ च्या प्रिव्हेन्शन ऑफ फुड अडल्ट रेशन अ‍ॅक्ट तयार करून त्यात कलम ४४ (अ, आ) चा अंर्तभाव करण्यात आला आहे. या नियमानुसार अ‍ॅसीलिटीन फळे विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाला दिले आहेत. जिल्हाभरात कार्बाइडने पिकविलेली फळे बाजारात आली आहेत. विशेष करून स्वस्त फळ म्हणून केळीचे सेवन केले जाते. मात्र केळ पिकविण्यसाठी कार्बाइडचा वापर केला जातो. कार्बाइड हे एक प्रकारचे विष आहे. याचे अतिशय घातक परिणाम शरीरावर दिसून येतात. त्यामुळे फळांबरोबरच बालकांना विषाचेही सेवन करावे लागत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने सदर फळांची बाजारपेठेत खुलेआम विक्री केली जात आहे. या फळांपासून दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे.

Web Title: Stay away from chemical fruits