शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्मचाऱ्यांचा संप मागे

By admin | Updated: October 3, 2015 01:20 IST

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या १० मागण्यांवर राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी होकार दर्शविला...

१० मागण्या मान्य : वित्तमंत्र्यांशी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची झाली गडचिरोलीत चर्चागडचिरोली : राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या १० मागण्यांवर राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी होकार दर्शविला असल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गडचिरोली येथे शुक्रवारी वित्त, वन व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी आले असताना राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्किट हाऊसमध्ये मंत्रीमहोदयांची भेट घेतली. या भेटीत संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष लतीफ पठाण, जिल्हा सरचिटणीस किशोर सोनटक्के, राजू रेचनवार, जी. के. ठाकरे, प्रशांत कापगते, रवी पेद्दीवार आदींनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान वित्तमंत्र्यांनी १० मागण्यांबाबत शासनाची सकारात्मक भूमिका आहे, असे स्पष्ट केले. यामध्ये गटविमा २४० रूपये, गणवेशभत्ता अडीच हजार रूपये देण्याचे मान्य केले, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पेंशन योजनेसाठी वेळेवर पासबूक देण्यात येईल. तसेच अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुन्या पद्धतीने पेंशन सुरू ठेवण्यात येईल, महसूल खात्याअंतर्गत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात पहारेकरी पद निर्माण करण्यात येईल, वन विभागाच्या सेवेत कायम केलेल्या वन मजुरांना सर्व शासकीय लाभ देण्यात येतील, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती संबंधी २५ टक्क्यावरून ५० टक्के करणे, धुलाई भत्ता वाढविणे, प्रत्येक पंचायत समितीमध्ये पहारेकरी पद निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, शिवाय चतुर्थ श्रेणी महिला कर्मचाऱ्यांना गणवेश बदली करण्यासाठी स्वतंत्र खोली व कपाटाची सोय करणे आदी मागण्या वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी मान्य केल्या.जानेवारी व जुलै महिन्याचा महागाई भत्ता लवकर लागू करून रोखीने देण्यावरही त्यांनी होकार दर्शविला. (स्थानिक प्रतिनिधी)