शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत साकारणार स्टेडिअम

By admin | Updated: January 8, 2015 22:55 IST

अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यात मैदानी व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धेत शहरी भागातील खेळाडूंपेक्षा ग्रामीण खेळाडू कमी पडू नयेत. त्यांना चांगल्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी,

अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यात मैदानी व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धेत शहरी भागातील खेळाडूंपेक्षा ग्रामीण खेळाडू कमी पडू नयेत. त्यांना चांगल्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी लवकरच अहेरी येथे मोठे स्टेडिअम उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांनी केली.आलापल्ली येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित तीन दिवशीय सांघिक, वैयक्तिक, बालक्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ना. आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या तालुका क्रीडा संमेलनात ३०० स्पर्धक व १०० शिक्षक सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीच्या सभापती रवीना गावडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, पं. स. उपसभापती सोनाली कंकडालवार, जि. प. सदस्य विजया विठ्ठलानी, लैजा चालूरकर, नंदा दुर्गे, पं. स. सदस्य सुखदेव दुर्योधन, आत्माराम गद्देकार, माजी सभापती मंदा गावडे, सुनीता मंथनवार, यमुना आत्राम, ऋषी पोरतेट, किशोर सुनतकर, अजय सोनलवार उपस्थित होते.शिक्षक संघटना, ग्रामसेवक संघटना तसेच इतर सामाजिक संघटनेच्यावतीने ना. आत्राम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पाहाराने सत्कार करण्यात आला. क्रीडा संमेलनाची सुरूवात आत्राम यांच्या हस्ते सरस्वती पूजन, क्रीडा ध्वजरोहण, क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाली. कार्यक्रमाला तहसीलदार कुणारपवार, संवर्ग विकास अधिकारी चांदेकर, भाजप महिला प्रदेश आघाडीच्या रहिमा सिद्धीकी, भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद अकनपल्लीवार, नाविसचे प्रकाश गुडेल्लीवार, सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षक उपस्थित होते. क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेकरिता सर्व केंद्रातील शिक्षक तसेच पंचांनी योग्य कामगिरी बजावून सहकार्य करावे, कुठलीही आक्षेपाची भावना न ठेवता परस्परांना क्रीडा भावनेने सामावून घ्यावे, असे आवाहन अजय कंकडालवार यांनी उपस्थितांना केले. क्रीडा संमेलनाचे प्रास्ताविक व आभार गटशिक्षणाधिकारी व्ही. जे. गिऱ्हे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)