शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळताे, ना वैद्यकीय बिले मिळतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:43 IST

एवढेच नव्हे, तर सेवा बजावत असताना आजारपण किंवा अपघातावर झालेला वैद्यकीय खर्चाची बिलेही लवकर मिळत नाहीत. कर्मचाऱ्यांनी दाखल केलेली ...

एवढेच नव्हे, तर सेवा बजावत असताना आजारपण किंवा अपघातावर झालेला वैद्यकीय खर्चाची बिलेही लवकर मिळत नाहीत. कर्मचाऱ्यांनी दाखल केलेली वैद्यकीय बिले सहा ते आठ महिने मंजूर होत नसल्याची माहिती आहे. एकीकडे पगार वेळेवर होत नसताना, उपचारांवर झालेला खर्च काेठून आणावा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडतो.

बाॅक्स

पगार दोन महिन्यातून एकदा

एसटीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कधीच वेळेवर पगार मिळत नाही. वेतन प्रधान अधिनियम १९३६ च्या तरतुदीनुसार महिन्याच्या १० तारखेच्या आत वेतन अदा करण्याची तरतूद असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. दोन ते तीन महिने पगार अदा केले जात नाही. जुलै महिन्याचा पगार सप्टेंबर महिन्यात देण्यात आला.

बाॅक्स

सहा महिने झालेत वैद्यकीय बिले मिळेनात

कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न करणाऱ्या एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले काढण्यातही कमालीची दिरंगाई केले जाते. सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजारपणात केलेला खर्च महामंडळाकडून दिला जातो. यासाठी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. तथापी, प्रस्ताव सादर केल्यानंतरही बिल निघण्यासाठी महिनोगणती वाट पाहावी लागते. सहा ते आठ महिने उलटूनही बिल निघत नाही. कधी कधी वर्ष उलटून गेल्यानंतरही बिल मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे

काेट

उपचारावर झालेला खर्च आणावा कोठून?

इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचे पगार कधीच वेळेवर होत नाहीत. दोन महिन्यातून एकदा पगार घ्यावा लागतो, अशी स्थिती आहे. वैद्यकीय बिलेही लवकर काढली जात नाहीत. अनेकदा तर ही बिले मिळतही नाहीत.

वैद्यकीय बिलासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतरही तो मंजूर होईलच याची शाश्वती नसते. यामध्येही अनेक अटी, शर्ती आहेत. आजारपणावर केलेला खर्च महामंडळाकडून मिळावा अशी अपेक्षा असते, परंतु अनेकदा उपेक्षाच पदरी पडते.

एक एसटी कर्मचारी

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

एकूण आगार-२

वाहक -२७४

चालक -३३६

अधिकारी- १७

कर्मचारी -६५