शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात एसटी बसची चाके मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजना शासनामार्फत केल्या जात आहेत. शाळांना सुटी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अर्धेच कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. बाजारपेठा, आठवडी बाजार बंद केले आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली; अनेक बसफेऱ्या कराव्या लागल्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणू प्रसाराच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याने एसटीला प्रवाशी मिळणेही कठीन झाले आहे. त्यामुळे काही बसफेºया रद्द कराव्या लागत आहेत. तसेच भारमान कमी राहात असल्याने एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. दरम्यान रविवारी ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केल्याने बसफेऱ्या निश्चित नसून प्रवाशी उपलब्ध असतील तरच फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजना शासनामार्फत केल्या जात आहेत. शाळांना सुटी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अर्धेच कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. बाजारपेठा, आठवडी बाजार बंद केले आहेत. तसेच मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आले असल्याने त्या शहरांमध्ये नागरिक जाण्यास तयार नाही. या सर्व बाबींमुळे मागील पाच दिवसांपासून प्रवाशांची संख्या घटली आहे.गडचिरोली आगारातून दर दिवशी ६८० बसफेऱ्या सोडल्या जातात. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने काही बसफेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. शुक्रवारी दिवसभरात केवळ ३८ टक्के भारमान आले. यातून डिझेलचाही खर्च भरून निघाला नाही. त्यामुळे शनिवारी अनेक बसफेºया रद्द केल्या. ४४ आसनक्षमता असलेल्या एसटीत केवळ २० प्रवाशी बसविण्याचे निर्देश आहेत. त्यामुळेही प्रवाशांची संख्या घटली आहे.प्रवाशांच्या गर्दीेने सदैव गजबजले राहणाऱ्या गडचिरोली येथील बसस्थानकात शनिवारी प्रवाशांची फारशी गर्दी दिसून आली नाही. ग्रामीण भागातीलच प्रवाशी बसस्थानकावर दिसून येत होते. नागपूर, यवतमाळ, अमरावती, पुणे यासारख्या शहरांमध्ये जाणारे प्रवाशी दिसून येत नव्हते.आज ९० टक्के बसफेऱ्या रद्द होण्याची शक्यताकोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी एसटीला प्रवाशी मिळणे कठीणच होणार असल्याने रविवारी एसटीच्या ९० टक्केपेक्षा अधिक बसफेऱ्या रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे एका सिटवर एकच प्रवासी बसवायचा आहे. या निर्देशाचे उल्लंघन करणाºया बसेसवर काही जिल्ह्यांमधील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी