शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादी प्रमाणिकरण मोहिमेला मिळणार गती

By admin | Updated: June 4, 2015 01:32 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी प्रमाणिकरण व शुध्दीकरण कार्यक्रमासाठी १४ जून रोजी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

चामोर्शी : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी प्रमाणिकरण व शुध्दीकरण कार्यक्रमासाठी १४ जून रोजी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी तळपाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
चामोर्शी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची सभा घेऊन मतदार यादीत समाविष्ट असलेले सर्व मतदारांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी लिंक करण्याकरिता माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु सदर कामामध्ये प्रगती नसल्याने सर्व पर्यवेक्षकांची सभा आयोजित करून या संदर्भात आढावा घेण्यात आला. सर्व पर्यवेक्षकांना आधार कार्ड गोळा करण्याबाबत अहवाल दररोज सादर करणे व ९० टक्के काम १० जून पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच तालुक्यातील १८ वर्ष पूर्ण झालेला एकही मतदार नोंदणीशिवाय राहणार नाही, या दृष्टीने त्यांचे नाव समाविष्ट करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
तसेच नाव दुरूस्ती, दुबार व मयत मतदारांची नावे वगळणे, १०० टक्के मतदारांचे फोटो गोळा करणे या कामावर लक्ष देण्याबाबतही निर्देश बैठकीत देण्यात आले. १४ जून रोजी विशेष मोहिमेमध्ये मतदार केंद्रांना भेटी देऊन गैरहजर असलेल्या व कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)