शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी घटली अन् भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:01 IST

२० वर्षांपूर्वी रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेत हाेते. मात्र काही कालावधीनंतर जवस व करडई या दाेन्ही पिकांचे उत्पादन घेणे बंद झाले. त्यानंतर शेतकरी खरीप हंगामात साेयाबीनच्या लागवडीकडे वळला हाेता. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपर्यंत साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र काही दिवसानंतर भाव पडायला सुरूवात झाली. त्या तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन ऐवजी कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाेषक वातावरण : तेलवर्गीय पिकांकडे वळण्याची गरज

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : तेलवर्गीय पिकांचे काही वर्षांआधी जिल्ह्यात बऱ्यापैकी उत्पादन घेतले जात हाेते. मात्र भाव पडल्याने शेतकऱ्यांना ताेटा हाेण्यास सुरुवात झाली. परिणामी या पिकांचे क्षेत्र घटले. पण आता तेलाची मागणी वाढली असल्याने तेलवर्गीय पिकांना बऱ्यापैकी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांकडे पुन्हा वळण्यास त्यांच्या उत्पन्नात चांगली भर पडू शकते.२० वर्षांपूर्वी रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेत हाेते. मात्र काही कालावधीनंतर जवस व करडई या दाेन्ही पिकांचे उत्पादन घेणे बंद झाले. त्यानंतर शेतकरी खरीप हंगामात साेयाबीनच्या लागवडीकडे वळला हाेता. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपर्यंत साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र काही दिवसानंतर भाव पडायला सुरूवात झाली. त्या तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन ऐवजी कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली. आता तर केवळ ५०० हेक्टरवर साेयाबीनची लागवड केली जात आहे. रबी हंगामात इतर सर्व पिकांना तिलांजली देत येथील शेतकरी आता मका पिकाकडे वळला असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात दरवर्षी मक्याचे क्षेत्र वाढत चालले आहे. एवढेच नाही तर आजपर्यंत ज्या शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात हाेते. त्या शेतीत आता मक्याची लागवड केली जात आहे. इतर कडधान्याच्या जमिनीतसुद्धा मका लावला जात आहे. मुरूमगाव, सावरगाव, मालेवाडा यासारख्या दुर्गम भागांमध्ये सुद्धा मक्याची लागवड केली जात आहे. 

शेतकऱ्यांना संधीगडचिराेली जिल्ह्यातील शेतजमीन व वातावरण तेलबियांच्या पिकांसाठी पाेषक आहे. रबी हंगामात प्रामुख्याने जवस, करडई, भुईमूग, साेयाबीन, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जात हाेते. कालांतराने या पिकांची जागा दुसऱ्या पिकांनी घेतली. आता मात्र तेलवर्गीय पिकांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे या पिकांची पेरणी करून अधिकचे उत्पादन घेण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. 

कमी सिंचनात उत्पादनतेलवर्गीय पिकांचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे अत्यंत कमी सिंचनात या पिकाचे उत्पादन हाेते. जवस, करडई, भूईमूग या पिकांना तर सिंचनाची अजिबात आवश्यकता राहत नाही. या पिकांवर इतर किडींचाही प्रादुर्भाव हाेत नाही. कीटकनाशके व सिंचनाचा खर्च कमी झाल्याने उत्पादन खर्चात घट हाेते. धान पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर त्याच ठिकाणी जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेणे शक्य आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.  

टॅग्स :agricultureशेती