शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत ४० हजार लोकांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सध्या ७० केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. त्यातील आठ केंद्र गडचिरोली शहरातच आहेत. त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला व बालरुग्णालय, दोन खासगी रुग्णालये असे चार केंद्र होते. आता आणखी चार केंद्र वाढविण्यात आले आहेत. त्यात हनुमाननगर शाळा, लांझेडा येथील शाळा, गोकुल नगरातील शाळा आणि वाकी येथील उपकेंद्राचा समावेश आहे. 

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिक आघाडीवर : अनेक फ्रंटलाइन वर्करही लसीकरणापासून दूर

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने आता नागरिक लसीकरणाकडे वळत आहेत. पण काही ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. आतापर्यंत ४० हजार लोकांनी लस घेतली. लसीकरणासाठी लोक पुढाकार घेत असल्याने केंद्रही वाढविण्यात आले आहेत; पण काही ठिकाणी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध न झाल्याने लसीकरणात खोळंबा येत आहे.जिल्ह्यात सध्या ७० केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. त्यातील आठ केंद्र गडचिरोली शहरातच आहेत. त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला व बालरुग्णालय, दोन खासगी रुग्णालये असे चार केंद्र होते. आता आणखी चार केंद्र वाढविण्यात आले आहेत. त्यात हनुमाननगर शाळा, लांझेडा येथील शाळा, गोकुल नगरातील शाळा आणि वाकी येथील उपकेंद्राचा समावेश आहे. याशिवाय नऊ ग्रामीण रुग्णालये, तीन उपजिल्हा रुग्णालये आणि ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे.आतापर्यंत लस घेतलेल्या नागरिकांमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर आहेत. त्यांची संख्या १४ हजार ४५६ आहे. ४५ ते ६० वर्ष वयोगटातील ११ हजार ६७६ जण तर फ्रंटलाइन वर्कर म्हणून सेवा देणाऱ्या १२ हजार ७३२ जणांनी लस घेतली आहे. अजून ३ ते ४ हजार फ्रंटलाइन वर्कर लसीकरणासाठी पुढे आलेले नाहीत.

१६ हजार लसी शिल्लक? जिल्ह्यात कोविशिल्ड लस १२ हजार, तर कोव्हॅक्सिन लस चार हजारच्या घरात शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. असे असताना काही केंद्रांवर लसीअभावी काम ठप्प कसे पडले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  ही लस ८० टक्केपर्यंत कोरोनापासून बचाव करू शकते. शिवाय लस घेतल्यानंतर कोरोनाची बाधा झालीच तर त्याची तीव्रता कमी होते, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

- तर लसीचा तिसरा डोसही देणारकोरोनाच्या दोन लसी घेतल्यानंतर त्यांचा परिणाम किती दिवस कायम राहतो याचे निरीक्षण केले जात आहे. त्यामुळे दोन डोसनंतर सहा महिन्यांनी पुन्हा लसीचा तिसरा डोस दिला जाण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस