शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

१२० अंगणवाड्या बनणार स्मार्ट

By admin | Updated: January 20, 2016 02:49 IST

जिल्ह्यातील पूर्वप्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच लोकसहकार्यातून कुपोषणमुक्ती करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने

मूलभूत सुविधा पुरविणार : आयएसओ दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्नदिगांबर जवादे ल्ल गडचिरोलीजिल्ह्यातील पूर्वप्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच लोकसहकार्यातून कुपोषणमुक्ती करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १२० अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या १२० अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा प्राप्त करून देऊन त्या प्रकल्पातील मॉडेल म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने तयारी सुरू केली आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने प्रत्येक गावामध्ये अंगणवाड्या स्थापन केल्या आहेत. जिल्हाभरात १ हजार ७७१ अंगणवाड्या व ५८३ मिनी अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमधून पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच लहान बालकांना व गरोदर मातांना पोषण आहार पुरविला जातो. त्याचबरोबर माता व बालकांसाठी आवश्यक असलेले लसीकरण अंगणवाडींच्या माध्यमातून दिले जाते. एकंदरीतच बालकाच्या जन्मापूर्वी व जन्मानंतरची पालन पोषणाची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडीच्या माध्यमातून पार पाडली जाते. कुपोषण मुक्तीसाठी अंगणवाड्या महत्त्वाची जबाबदारी पार पाडीत असल्या तरी गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा दर्जा सुमार आहे. ही बाब अनेकवेळा सिध्द झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने या अंगणवाड्यांमध्ये बालक व मातांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. २०१६ मध्ये किमान प्रत्येक प्रकल्पांतर्गत १० अशा एकूण १२ प्रकल्पातील १२० अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा प्राप्त करून घेण्याचा निर्धार केला आहे. आयएसओ दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा या अंगणवाड्यांना पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्या स्मार्ट बनतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग कामाला लागला आहे. याबाबतचे निर्देश व माहिती अंगणवाड्यांना देण्यात आले आहेत.जिल्ह्यात पहिल्यांदाच प्रयत्न४मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा प्राप्त झाला आहे व या अंगणवाड्या परिसरातील अंगणवाड्यांसाठी एक मॉडेल म्हणून काम करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मात्र आयएसओ दर्जा प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदाच प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनानेही काही आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविली आहे. तर काही रक्कम लोक सहभागातून अंगणवाडी सेविकेला गोळा करावी लागणार आहे. आयएसओ दर्जासाठी आवश्यक बाबी ४अंगणवाडीला आयएसओ दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी अंगणवाडीतील कुपोषीत बालकांची संख्या आठ टक्केपेक्षा कमी असावी, अंगणवाडीतील समित्यांच्या बैठका नियमितपणे घेण्यात याव्यात, विद्यार्थ्यांशी संदर्भातील रेकॉर्ड पूर्णपणे भरलेला असावा, विद्यार्थ्यांना १ ते २० पर्यंतचे इंग्रजी व मराठीतील पाढे, संपूर्ण इंग्रजी बाराखडी, दोन मराठी गीत, दोन हिंदी गीत व एक इंग्रजी गीत येणे आवश्यक आहे. मुख्य रंग, मुख्य आकार व मुख्य पक्षी, प्राणी, भाजीपाला, शरीराचे अवयव ओळखता येणे गरजेचे आहे. अंगणवाडींची खोली व सभोवतालचे वातावरण लहान मुलांच्या चिकित्सक वृत्तीला प्रेरणा देणारे असावे, मुलांची हजेरी जास्तीत जास्त असावी, अंगणवाडीमध्ये घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग असावा, अंगणवाडी शिक्षीकेने नियमितपणे गृहभेटी घेऊन पालकांशी चर्चा करावी, आदी बाबींचा समावेश आहे. या बाबी अंगणवाडीमध्ये असण्याच्या दृष्टीने महिला व बाल कल्याण विभागाने तालुकास्तरावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात सभा घेऊन अंगणवाड्यांची निवड केली आहे. या सर्व सोयीसुविधा प्राप्त झाल्यानंतर आयएसओच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले जाणार आहे. आयएसओ दर्जा प्राप्त करण्यासाठी १२० अंगणवाड्यांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार महिला व बाल कल्याण विभाग प्रयत्न करीत आहे. किमान ७५ पेक्षा अधिक अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी पालकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. - सचिन जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली