शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सौर प्लेटांचे पडले तुकडे

By admin | Updated: May 1, 2016 01:12 IST

जिल्हाभरातील सर्वच आश्रमशाळांना आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने सोलर वॉटर हिटर पुरविण्यात आले.

कोट्यवधींचा खर्च पाण्यात : आश्रमशाळेतील सोलर वॉटर हीटर भंगारातगडचिरोली : जिल्हाभरातील सर्वच आश्रमशाळांना आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने सोलर वॉटर हिटर पुरविण्यात आले. यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च करण्यात आला. मात्र हे सोलर वॉटर हिटर वापरात नसल्याने यांच्या पत्र्यांचे तुकडे पडण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी दिली आहे. प्रत्येक आश्रमशाळेमध्ये ५०० ते ७०० विद्यार्थी शिक्षण घेतात. हिवाळ्याच्या दिवसात या विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आदिवासी विभागाने सोलर वॉटर हिटर खरेदी करून ते आश्रमशाळेच्या परिसरात लावले. सोलर वॉटर हिटर खरेदी करण्यामागे विद्यार्थ्यांच्या हिताऐवजी कमिशन हाच महत्त्वाचा उद्देश होता. हे सयंत्र लावण्यात आले. मात्र तीन वर्षांचा कालावधी उलटून एकदाही सुरू करण्यात आले नाही. सोलर वॉटर सयंत्राच्या सभोेवताल गवत उगविले आहे. सोलर वॉटर हिटरच्या टँक, प्लेटांचे तुकडे पडण्यास सुरुवात झाली आहे. काही सामानाची अजूनपर्यंत फिटिंगसुद्धा करण्यात आली नाही. प्रत्येक आश्रमशाळेमध्ये ५०० ते ७०० दरम्यान विद्यार्थी शिक्षण घेतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील विद्यार्थ्यांना सोलर वॉटर हिटरचे पाणी पुरणार काय, याचाही विचार करण्यात आला नाही. केवळ कमिशन मिळविण्याकरिता आदिवासींच्या विकासाचे नाव घेऊन अशा प्रकारच्या अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. सोलर वॉटर हिटरमध्ये शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र शासनही अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहे. आजपर्यंत एकाही अधिकाऱ्यावर या प्रकरणी कारवाई झाली नाही. याचा अर्थ लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणात मलाई खाल्ली असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोेप प्रा. दहिवडे यांनी केला आहे. (नगर प्रतिनिधी)आदिवासींची दिशाभूलआदिवासींच्या विकासाच्या नावावर ज्या वस्तूमध्ये सर्वाधिक कमिशन मिळते, अशा वस्तूंची खरेदी केली जाते. या वस्तू खरेदीतून आदिवासींच्या विकासाऐवजी अधिकारी व लोकप्रतिनिधींचेच भले होते. मात्र यातील जनतेचे कोट्यवधी रूपये खर्च होतात. यावर प्रतिबंधक घालणे आवश्यक झाले आहे.