ओबीसींच्या माेर्चाला शिवसेनेचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:35 IST2021-02-13T04:35:27+5:302021-02-13T04:35:27+5:30

ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसींचे जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात येऊ नये, ...

Shiv Sena's support to OBC's march | ओबीसींच्या माेर्चाला शिवसेनेचा पाठिंबा

ओबीसींच्या माेर्चाला शिवसेनेचा पाठिंबा

ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसींचे जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात येऊ नये, यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मागण्यांच्या अनुषंगाने शिवसेनेचा पाठिंबा आहे. या माेर्चात सहभागी व्हावे, असे जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार, उपजिल्हाप्रमुख भरत जोशी, राजू कावळे, धर्मा राॅय, अरविंद कात्रटवार, रियाज शेख, नंदू कुमरे, राजू अंबानी, हेमलता वाघाडे, प्रभारी कल्पना तिजारे, अश्विनी चौधरी, रमेश मानकर, राहुल घोगरे, महेंद्र शेंडे, डाॅ. श्रीकांत बनसोड, गजानन नैताम, शेखर उईके, अमित यासलवार, नीलकमल मंडल, अक्षय करपे, खुशाल मडावी, चंदू बेझलवार, दुर्गे ताेकला, किसन मट्टामी, सुनील पोरेड्डीवार यांनी केले आहे.

Web Title: Shiv Sena's support to OBC's march