शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपट बंदीने झाडीपट्टीला लागले मंडईचे वेध

By admin | Updated: April 1, 2016 01:53 IST

सर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्यानंतर गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टीतील नागरिकांना मंडईचे वेध लागले आहेत.

गर्दी वाढली : गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विशेष महत्त्वअतुल बुराडे विसोरासर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्यानंतर गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टीतील नागरिकांना मंडईचे वेध लागले आहेत. शंकरपटाऐवजी आता नागरिक मंडईमध्ये गर्दी करू लागले असल्याने मंडईची क्रेझ वाढली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. त्यामुळे या चार जिल्ह्यांना महाराष्ट्राचे तांदळाचे कोठार म्हणूनही ओळखल्या जाते. खरीप हंगामातील धान पीक नोव्हेंबर महिन्यात निघते. डिसेंबर महिन्यात कापणी व बांधणीचे काम पूर्ण होते. सतत चार महिने धानाच्या शेतीत राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याला थोडीफार उसंत मिळते. त्याचबरोबर धान विकून पैसेही जमा होतात. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्याच्या घरी आनंद व पैसा खेळायला लागतो. या दिवसांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये मंडईचे आयोजन करण्यात येते. मंडई हा एकच शब्द असला तरी मंडईच्या दिवशी त्या गावामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडईच्या दिवशी दिवसभर गावाच्या जवळपास छोटेखानी जत्रेचे आयोजन करण्यात येते. या जत्रेला गावातील नागरिकांचे नातेवाईक व सभोवतालच्या गावांमधील नागरिक उपस्थित राहतात. रात्रीच्या सुमारास त्या गावामध्ये दंडार, नाटक, तमाशा, छत्तीसगडी नृत्य आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे दिवस व रात्रभर विविध कार्यक्रमांचे रेलचेल राहते. सर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटांवर बंदी घालण्याच्या पूर्वी जत्रेबरोबरच शंकरपटाचे आयोजनही केले जात होते. मात्र शंकरपटावर बंदी घातली असल्याने आता मंडईमध्ये नागरिकांची गर्दी वाढायला लागली आहे. मंडईचे आयोजन महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांबरोबरच सीमेवरच्या छत्तीसगड राज्यांतील जिल्ह्यांमध्येही आयोजित केली जाते. एकच दिवसाची मंडई भरत असली तरी त्या गावासाठी तो सर्वाधिक आनंदाचा दिवस राहते. त्यामुळे त्या मंडईच्या दिवसाचे वेध गावकऱ्यांना दोन महिन्यांपासूनच लागलेले राहते. नियोजन करून मंडईचा आनंद कसा लुटायचा हे ठरविले जाते. फेब्रुवारी महिन्यापासून मंडई भरण्यास सुरूवात झाली आहे. सध्या मंडईची रेलचेल ग्रामीण भागामध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.मंडईतून लग्नही जोडतातमंडईच्या निमित्ताने सर्व नातेवाईकांना बोलविले जाते. त्यामुळे मंडईसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक उपवर- वधू यांच्याविषयी बोलणी करतात. ही प्राथमिक बोलणी राहते. त्यानंतर लग्न जोडल्या जाते. त्याचबरोबर मंडईसाठी तरूण मुले- मुली एकमेकांना पसंत करतात. त्यामुळे मंडईच्या माध्यमातून लग्न जुडण्यासही मदत होत असल्याने मंडईचे महत्त्व आणखीच वाढले आहे.