नालीअभावी अंतर्गत रस्त्यावरून वाहते सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST2021-04-03T04:32:38+5:302021-04-03T04:32:38+5:30

जाेगीसाखरा : आरमाेरी तालुक्यातील पिसेवडधा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येंगाडा येथे नालीचे बांधकाम झाले नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे ...

Sewage flowing from internal roads due to lack of drainage | नालीअभावी अंतर्गत रस्त्यावरून वाहते सांडपाणी

नालीअभावी अंतर्गत रस्त्यावरून वाहते सांडपाणी

जाेगीसाखरा : आरमाेरी तालुक्यातील पिसेवडधा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येंगाडा येथे नालीचे बांधकाम झाले नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. येंगाडा येथील रामदास सयाम ते श्रावण सिडाम यांच्या शेतापर्यंत नाली बांधकाम आवश्यक हाेते. मात्र नाली बांधण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील घरांमधून निघणारा सांडपाणी बाराही महिने रस्त्यावरून वाहते. या सांडपाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे.

फरशी असलेली बंद नाली बांधणे गरजेचे आहे. गावातील अरूंद रस्त्यावर नाल्यांचा अभाव आहे. अनेक नागरिकांची घरे एकलग असल्याने त्यांच्या घरापर्यंत अद्यापही नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना येथून आवागमन करताना अडचणी येत आहेत. स्थानिक नागरिकांनी सचिव, सरपंचांना ही बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र नालीचे बांधकाम झाले नाही. नाली बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Sewage flowing from internal roads due to lack of drainage