शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

भामरागड : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली, तरी भामरागड ...

भामरागड : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली, तरी भामरागड येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खासगी वाहनांमुळे एसटीला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे.

कोंडवाडे जीर्णावस्थेत

अहेरी : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्यांचे छप्पर पूर्णपणे उडून गेले आहे.

अनेक कार्यालयांमधील बायोमेट्रिक नावापुरतेच

कोरची : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, काळाच्या ओघात अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत.

गेवर्धा-शिरपूर मार्गाचे रुंदीकरण करा

कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा-अरततोंडी-शिरपूर या मार्गावरील वर्दळ वाढल्याने मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरून कुरखेडा-शिरपूर बसचे आवागमन होते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे.

आलापल्लीत फवारणी करण्याची मागणी

आलापल्ली : येथील अनेक वॉर्डातील नाल्यांचा गाळ उपसा करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, वॉर्डात डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले आहे.

नाक्यावर अल्प कर्मचारी

गडचिरोली : तालुक्यातील नाक्यावर केवळ अपुरे कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत तीन पाळ्यांमध्ये आपली जबाबदारी निभवावी लागत आहे. एका कर्मचाऱ्याला किमान १६ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे नाक्यावरील कर्मचारी त्रस्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी हाेत आहे.

काेपरअल्ली मार्ग खड्ड्यात

मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून, रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व नागरिकांना करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

भूमी अभिलेखची पदे रिक्त

एटापल्ली : उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात १७ मंजूर पदांपैकी केवळ आठ पदे भरलेली आहे. मुख्य उपअधीक्षकाचे पद रिक्त असून, सिरोंचा येथील अधिकाऱ्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना एटापल्ली व सिरोंचा अशा दोन ठिकाणचा पदभार चालविणे कठीण झाले आहे.

अहेरीत वाहतूककोंडी

अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर, या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

हातगाड्यांचे अतिक्रमण

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध विकत असतात. या दुकानासमोर उभे राहून अनेक नागरिक वस्तू खरेदी करतात. यामुळे वाहतूक प्रभावित होते. त्यामुळे अतिक्रमण काढावे, अशी मागणी हाेत असतानाही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

निवास स्थान सक्तीचे करा

अहेरी : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने, कर्मचाऱ्यांच्या देखभालीअभावी ही निवास स्थाने ओसाड झाली आहेत. ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, तसेच वनविभागाचे कर्मचारी तालुका मुख्यालयी राहत नाही.