शहरं
Join us  
Trending Stories
1
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत परसेल अंधकारा, कोण कोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
4
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
5
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
6
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
7
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
8
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
9
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
10
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
11
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
12
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
13
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
14
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
15
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
16
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
17
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
18
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
20
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
Daily Top 2Weekly Top 5

नऊ तास चाललेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश; ७ माओवाद्यांचा केला खात्मा

By संजय तिपाले | Updated: December 3, 2025 18:16 IST

नऊ तास चकमक : घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा आढळला, सर्च ऑपरेशन सुरुच

गडचिरोली : छत्तीसगडच्या पश्चिम बस्तर विभागातील बिजापूर–दंतेवाडा अंतरजिल्हा सीमेवर ३ डिसेंबर रोजी सकाळपासून सुरू झालेली माओवाद्यांविरोधातील निर्णायक कारवाई संध्याकाळपर्यंत सुरूच राहिली. सलग नऊ तास चाललेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांनी मोठे यश मिळवत सात माओवाद्यांना ठार केले. मात्र, दोन धैर्यवान डीआरजी जवानांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी या चकमकीत प्राण गमावले. एक जवान जखमी झाला. 

बिजापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांच्या माहितीनुसार,  बिजापूर व दंतेवाडीतील माओवादविरोधी विशेष पथक (डीआरजी), एसटीएफ, कोब्रा, आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाकडून ३ रोजी पहाटेपासून सर्च ऑपरेशन राबविण्यात येत होते. सकाळी नऊ वाजताच सीमेवरील घनदाट जंगल पट्ट्यात माओवाद्यांनी   गोळीबार करून जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षा दलांनी आक्रमक पवित्रा घेत माओवाद्यांच्या दबा धरून बसलेल्या तळांवर जोरदार प्रत्युत्तर केले.  अधून- मधून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरुच होता. घटनास्थळावरुन आतापर्यंत सात माओवादी   मृतदेह मिळाले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.एसएलआर रायफल्स,   काडतुसे, डेटोनेटर आणि अन्य माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दोन जवान शहीद, एक जखमी

या कारवाईदरम्यान बिजापूरच्या डीआरजी पथकातील मोनू वडाडी, दुकारू गोंडे हे दोन जवान शहीद झाले.याशिवाय जवान सोमदेव यादव जखमी झाले असून   प्राथमिक उपचार करण्यात आले. ते सध्या सुरक्षित आणि धोक्याबाहेर आहेत.

माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र

बस्तर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज पट्टलिंगम यांनी परिसरात माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र केले असल्याचे सांगितले. अतिरिक्त कुमक तातडीने रवाना करण्यात आली असून जंगल पट्ट्याला पूर्णपणे घेराव घातला आहे. माओवाद्यांचे उरलेले गट बाहेर पडू नयेत यासाठी कडक नाकेबंदी करण्यात आली आहे. लढाई निर्णायक वळणार

बिजापूर–दंतेवाडा सीमेवरील ही कारवाई बस्तरातील मोठ्या माओवादी तुकडीला दिलेला जोरदार धक्का मानला जात आहे. सलग ९ तासांच्या चकमकीने जंगल परिसर हादरुन गेला होता. आजची कारवाई पाहता सुरक्षा दलांनी पश्चिम बस्तरातील माओवादी दबदबा अत्यंत कमकुवत करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Security Forces Kill 7 Maoists in 9-Hour Bijapur Encounter

Web Summary : Security forces killed seven Maoists in a nine-hour encounter on the Bijapur-Dantewada border. Two DRG soldiers were martyred and one injured during the operation. The forces recovered weapons and Maoist materials. Anti-Maoist operations have intensified in the region.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली