शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

२८ पोलीस कर्मचाऱ्यांवर ५५ गावांच्या सुरक्षेचा भार

By admin | Updated: May 13, 2016 01:34 IST

जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे आॅक्टोबर २०१५ मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाली.

चोरींच्या घटनांमध्ये वाढ : आष्टी पोलीस ठाण्याला हवेत ५० कर्मचारी आष्टी : जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे आॅक्टोबर २०१५ मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. या पोलीस ठाण्याला २८ पोलीस कर्मचारी देण्यात आले. मात्र सदर संख्या अपुरी आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार पाहता आष्टी पोलीस ठाण्याला ५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आष्टी परिसरात घडणारे विविध गुन्हे व चोरींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आष्टी पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर येथे ५० ते ६० कर्मचारी नियुक्त करणार असल्याचे राज्य शासनामार्फत सांगण्यात आले होते. मात्र याला सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही आष्टी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली नाही. आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण ५५ गावांचा समावेश आहे. या ५५ गावांच्या परिसरात घडणाऱ्या विविध घटना, गुन्हे, आत्महत्या, भांडण, तंटे आदींची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. काही दिवसापूर्वी आष्टी गावात अज्ञात चोरट्यांनी दोन दिवसात नऊ ठिकाणी घरफोडी केली. त्यामुळे गावातील नागरिक धास्तावले आहेत. वाढत्या चोरींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन आष्टी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकावर आहे. सद्य:स्थितीत आष्टी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून उमेश बेसरकर आहेत. याशिवाय तीन पोलीस उपनिरीक्षक, महिला व पुरूष पोलीस कर्मचारी असे एकूण २८ कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने आष्टी पोलीस ठाण्यात आणखी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)