शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

हुडूकदुम्मातील दुसरा बंधाराही वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 6:00 AM

हुडूकदुम्मा येथे १० लाख ७२ हजार ८३७ रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. हुडूकदुम्मा हे गाव कोरचीपासून पूर्वेस २५ किमी अंतरावर आहे. या गावात कोणत्याही प्रकारच्या सिंचनाच्या सुविधा नाहीत.

ठळक मुद्देदर्जावर प्रश्नचिन्ह : १८ लाखांचा खर्च व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुक्यातील हुडूकदुम्मा येथे दोन बंधारे बांधण्यात आले. पहिला बंधारा वाहून गेल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. अधिकची माहिती घेतल्यानंतर या गावातील दुसराही बंधारा पहिल्याच पावसाने वाहून गेल्याची बाब उजेडात आली आहे.हुडूकदुम्मा येथे १० लाख ७२ हजार ८३७ रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. हुडूकदुम्मा हे गाव कोरचीपासून पूर्वेस २५ किमी अंतरावर आहे. या गावात कोणत्याही प्रकारच्या सिंचनाच्या सुविधा नाहीत. त्यामुळे सदर गावात सिंचन सुविधा निर्माण होण्यासाठी बारमाही वाहणाऱ्या नाल्यावर बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. प्रशासकीय यंत्रणेनेही बंधारा बांधण्याला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. हुडूकदुम्मा येथील सदर नाल्यावर मागील पाच वर्षात चार बंधारे बांधण्यात आले. पाच वर्षापूर्वी वन विभागाने बंधारा बांधला. दोन वर्षापूर्वी सिंचन विभागाने बंधारा बांधला. हे दोन्ही बंधारे योग्यस्थितीत आहेत. परंतु चार महिन्यापूर्वी बांधलेले गावातील दोन्ही बंधारे पावसाच्या पाण्याुळे वाहून गेले. बंधारे तुटफूट झाल्याने अवस्था बिकट झाली. सदर दोन्ही बंधारा बांधकामासाठी एकूण २१ लाख ४५ हजार ६७४ रुपयांचा खर्च आला. मात्र अल्पावधीतच हे बंधारे पहिल्याच पावसात वाहून गेल्याने शासनाचे लाखो रुपये व्यर्थ गेले आहे.दोन्ही सिमेंट नाला वाहून गेले. बंधाºयाचे काम निकृष्ट करणाºया कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाग्रामसभेचे सचिव नरेंद्र सलामे, ग्रामसभा अध्यक्ष बल्लुराम हिचामी, सरपंच कल्पना नैताम यांनी केली आहे.दुरूस्ती करणारवृत्त प्रकाशित होताच विभागाचे कनिष्ठ अभियंता पेंदोरकर व कंत्राटदार बब्बू मस्तान बंधाºयाच्या ठिकाणी पाहणीसाठी आले. देखभाल दुरूस्तीचा कालावधी पाच वर्ष असून दुरूस्तीसाठी १० टक्के निधी राखीव आहे. पाऊस कमी झाल्यावर बंधाºयाची दुरूस्ती करण्यात येईल, अशी माहिती अभियंत्यांनी दिली.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर