शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

संसर्ग व श्वसनाच्या आजारग्रस्तांची शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी आपले आजार किंवा कोणतीही लक्षणे असल्यास ती लपवू नये. आशा सेविकांना सर्व माहिती सांगावी.

ठळक मुद्देकोरोनाला रोखण्याचा प्रयत्न : सर्व्हेक्षणकर्त्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असताना या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी जिल्ह्यात संसर्गजन्य आजारांसह श्वसनाचा आजार असलेल्यांचा शोध घेण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. गावपातळीवर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाबाधितांचा शोध घेऊन तातडीने उपचार करणे, तसेच इतर संसर्गजन्य आजार, मलेरिया आणि श्वसनाच्या आजाराचे रु ग्ण शोधून त्यांना त्वरित संदर्भ सेवा देणे यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी आपले आजार किंवा कोणतीही लक्षणे असल्यास ती लपवू नये. आशा सेविकांना सर्व माहिती सांगावी. कारण जर असे आजार किंवा लक्षणे लपविली तर भविष्यात साथरोग मोठया प्रमाणात फैलावू शकतो. आरोग्य यंत्रणेला दिलेली सर्व माहिती गोपनिय ठेवण्यात येईल, असे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी या सर्व्हेक्षणाला सुरूवात करताना सांगितले.
सर्व्हेक्षणकर्त्यांना कोणत्याही कुटुंबात संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळल्यास, मलेरियासाठी रक्त नमुना, टी.बी.साठी थुंकी नमुना जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन द्यावा लागणार आहे. लहान मुलांमध्ये सर्दी व खोकला, ताप, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, श्वसनाचा दर वाढणे, खाणे-पिणे सोडून देणे, झटके येणे, मुल सुस्त होणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. आशा, आरोग्य सेविकांच्या गृहभेटीत या सर्वांची माहिती घेतली जाणार आहे. महिला-किशोरवयीन मुली यांची तपासणी करताना मासिक पाळी रजिस्टर, मासिक पाळी स्वास्थ्य, सॅनिटरी पॅड्सची उपलब्धता याबाबत आढावा घेणार आहेत. गरोदर मातांच्या आरोग्य स्थितीची पडताळणी केली जाईल.

आरोग्य कर्मचाऱ्यांना हवी या प्रश्नांची उत्तरे
सर्वेक्षणादरम्यान आरोग्य यंत्रणेकडून घरोघरी जाऊन माहिती जाणून घेतली जाणार आहे. त्यात घरातील कोणाला ताप आहे का? खोकला आहे का? श्वास घेण्यास त्रास आहे का? दम, धाप लागते आहे का? घरात ६० वर्षावरील व्यक्ती आहे का? उच्च रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग किंवा इतर दुर्धर आजार आहे का? असे प्रश्न विचारतील. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कोणत्याही नवीन तसेच जुन्या आजारांबाबतची योग्य ती माहिती देणे आवश्यक आहे. यातून जिल्ह्याची आरोग्यविषयक तपशीलवार माहिती एकत्र होण्यास मदत मिळणार आहे. यातूनच कमी व जास्त जोखमीच्या लोकसंख्येचे प्रमाण आणि आकडेवारीही समोर येणार आहे.

हे आजारग्रस्त नागरिक ठरणार जोखमीचे
तीव्र जोखमीच्या लोकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) रु ग्ण, गर्भवती व स्तनदा माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि इतर दीर्घ आजार असलेल्या नागरिकांचा समावेश आहे. ६० वर्षावरील अशा सर्व व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी शक्यतो घराबाहेर निघू नये. आवश्यकता असल्यास योग्य काळजी घेऊन बाहेर पडावे. सर्दी, खोकला व शरीराचे तापमान १००.४ फॅरेनाइट किंवा ३८ अंश सेल्सियस व त्यापेक्षा अधिक असल्यास, दम, धाप जास्त प्रमाणात लागणे, श्वसन दर वाढल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन त्वरित तपासणी करणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक