शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलून गेल्या शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 05:00 IST

दीड वर्षांपासून शाळा बंद हाेत्या. मात्र, विद्यार्थी शाळेत येताना काेणतीही जुनी गाेष्ट विसरले नाही. गणवेश घालून वेळेवर शाळेत पाेहाेचले. विशेष म्हणजे यावेळी शिस्तीचे पूर्ण पालन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत माेठ्या उत्साहात करण्यात आले. काही ठिकाणी पुस्तक, काही ठिकाणी गणवेश तर काही शाळांमध्ये शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील शाळा साेमवारी उघडल्या. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते आठवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या मिळून एकूण १२०० शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रत्यक्ष वर्ग भरविण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकारी हेमलता परसा, माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन पहिल्या दिवशीच्या स्थितीची पाहणी केली. अनेक शाळांमध्ये शिक्षक व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.दीड वर्षांपासून शाळा बंद हाेत्या. मात्र, विद्यार्थी शाळेत येताना काेणतीही जुनी गाेष्ट विसरले नाही. गणवेश घालून वेळेवर शाळेत पाेहाेचले. विशेष म्हणजे यावेळी शिस्तीचे पूर्ण पालन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत माेठ्या उत्साहात करण्यात आले. काही ठिकाणी पुस्तक, काही ठिकाणी गणवेश तर काही शाळांमध्ये शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. शाळांमध्ये सुरक्षित अंतर बाळगुण सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्यात आला. शरीराचे तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण माेजून विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यात आले. माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही शाळांना भेटी देेऊन तेथील पहिल्या दिवशीची परिस्थिती जाणून घेतली.  शिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी काटली येथील जि. प. प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गटशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत यांनी नगरी येथील जि. प. शाळेला भेट देऊन तेथील साेयी-सुविधांची पाहणी केली. इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र घुगरे व तेथील शिक्षक उपस्थित हाेते. 

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या