शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, महाविद्यालये कडकडीत बंद

By admin | Updated: July 23, 2014 23:36 IST

ओबीसी समाजाच्या विविध मागण्या निकाली काढण्यासाठी आज बुधवारी गडचिरोली जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.

ओबीसींचे आंदोलन : जिल्हाभरातून ओबीसी संघटनांनी पाठविले शासनाला निवेदनगडचिरोली : ओबीसी समाजाच्या विविध मागण्या निकाली काढण्यासाठी आज बुधवारी गडचिरोली जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात शाळा, महाविद्यालय बंद होते. गडचिरोली शहरात स्थानिक इंदिरा गांधीत चौकात पेसा कायद्याच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. गडचिरोली शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आज सकाळपासूनच बंद होते. यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात समितीचे अधीक्षक अरूण पाटील मुनघाटे, रमेश भुरसे, प्रा. शेषराव येलेकर, प्रशांत वाघरे, बाबुराव कोहळे, प्राचार्य खुशाल वाघरे, दादाजी चापले, गोविंदराव बानबले, देवराव म्हशाखेत्री, दादाजी चुधरी, राजेंद्र लांजेकर, पांडुरंग घोटेकर, अ‍ॅड. संजय ठाकरे, विलास निंबोरकर, रत्नदीप म्हशाखेत्री, पुरूषोत्तम म्हस्के, प्रा. त्र्यंबक करोडकर, दत्तात्रय खरवडे, गणेश वसू, जगदीश लडके, सुधाकर पेटकर, भास्कर म्हस्के, प्रा. देवानंद कामडी, नामदेव शेंडे, प्रा. विजय दिघडे, पुरूषोत्तम झंझाळ, प्रा. सूर्यकांत भोंगळे आदी उपस्थित होते.आष्टी येथेही आज ओबीसी समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व महेश चौधरी, रवी बोरकुटे, कपील पाल, मंगेश पोरटे, आशिष खरबनकर, राहुल तागडे, गणेश चौधरी, धनराज चापले, प्रकाश बोबाटे यांनी केले.वैरागड परिसरातील कढोली, वैरागड, मानापूर, देलनवाडी येथील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. धानोरा येथे ओबीसीच्या या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राखडे महाराज, नानाजी पाल, मुन्ना चंदेल, विलास कोडाप, महादेव गणोरकर, शिवराम चिमुरकर, विनोद लेनगुरे, राकेश खरवडे, गुरूदेव सोनुले, वैभव कोटांगले, सोमाजी गुरनुले आदी उपस्थित होते. रांगी येथे आंदोलनात नरेंद्र भुरसे, नंदू कुनघाडकर, शामराज कुकडकार, दिनेश चापडे, कैलाश चापडे, नितीन कावळे यांनी सहभाग घेतला. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा तालुक्याही चांगला प्रतिसाद मिळाला.