शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराला दांडी

By admin | Updated: July 7, 2015 01:28 IST

२६ जूनपासून जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत.

धान्य पुरवठ्याचा अभाव : अनेक शाळेत आहार शिजलाच नाही
आष्टी : २६ जूनपासून जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र बऱ्याच शाळांमध्ये शालेय पोषण आहाराकरिता पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश शाळांमध्ये शालेय पोषण आहाराला दांडी मारली जात असल्याचे चित्र आहे. बहुतांश शाळांमध्ये पोषण आहार शिजलाच नसल्यामुळे विद्यार्थी आहारापासून वंचित आहेत. परिणामी शासनाच्या मध्यान्ह पोषण आहार योजनेचा फज्जा उडाला आहे.
शासन व प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी २६ जूनला नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यासाठी अनेक गावांत रॅली काढण्यात आली. यात लोकप्रतिनिधींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षक सहभागी झाले. मात्र शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी शासन व प्रशासनाने कुठलीही व्यवस्था केली नाही. परिणामी अनेक शाळेमध्ये शालेय पोषण आहाराकरिता धान्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे दोन आठवड्यात अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला नाही.
जिल्ह्याच्या काही जि. प. शाळांमधील मुख्याध्यापकांनी मागील वर्षीचा शिल्लक उरलेला काही धान्यसाठा व्यवस्थित राखून ठेवला. अशा मोजक्याच शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्या जात आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, विद्यार्थी शाळेत नियमित यावे, यासाठी शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरू केली. मात्र प्रभावी अंमलबजावणी नाही. (प्रतिनिधी)

अहेरी, चामोर्शी तालुक्यात धान्य पुरवठा नाही
अहेरी व चामोर्शी तालुक्यात अद्यापही शालेय पोषण आहाराकरिता पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी व कोनसरी केंद्रांतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात न आल्याने या शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांकरिता पोषण आहार शिजला नसल्याची माहिती आहे. आष्टी केंद्रात केवळ मार्र्कं डा (कं.) व एका खासगी शाळेत आहारासाठी धान्याचा पुरवठा झाला आहे. मात्र या केंद्रातील १३ शाळांमध्ये धान्य पुरवठा न झाल्याने विद्यार्थी आहारापासून वंचित आहेत.
चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत कोनसरी केंद्रातील १३ जिल्हा परिषद शाळांमध्ये मागील वर्षीचा पोषण आहाराचा धान्यपुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये नियमित पोषण आहार दिला जात असल्याची माहिती केंद्रप्रमुखांनी दिली आहे. मात्र यंदाच्या २०१५-१६ च्या सत्रात अद्यापही कोनसरी केंद्रातील शाळांना पोषण आहाराकरिता धान्य पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे.

चामोर्शी तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी शाळांमध्ये धान्याचा पुरवठा करणे सुरू झाले आहे. चामोर्शी पं. स. अंतर्गत चार केंद्रावर तेथील शाळांकरिता धान्य पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित केंद्रांमध्ये लवकरच धान्य पुरवठा होईल.
- एस. जी. परदेशी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, चामोर्शी