शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनावर संतांची नाराजी

By admin | Updated: December 30, 2016 02:24 IST

देशात सत्ताबदल झाल्यानंतर गोरक्षा, राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, अशी अपेक्षा होती.

‘अच्छे दिन’ची अनुभूतीच नाही : ‘विहिंप’च्या मंचावरून गोविंदगिरी महाराजांनी टोचले कान नागपूर : देशात सत्ताबदल झाल्यानंतर गोरक्षा, राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतीत कुठलेही अनुकूल वातावरण दिसून येत नाही. देशात ‘अच्छे दिन’ आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अनुभूती कुठेही येत नाही, या शब्दांत स्वामी मंगलगिरी आश्रमचे स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी केंद्र शासनावर टीकास्त्र सोडले आहे. विशेष म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या मंचावरून त्यांनी या भावना व्यक्त केल्या. गुरुवारपासून नागपुरातील माँ उमिया धाम येथे ‘विहिंप’च्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला सुरुवात झाली. उद्घाटन सत्राला उपस्थित अडीचशेहून अधिक प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना गोविंदगिरी महाराजांनी केंद्राच्या धोरणांवर असमाधानी असल्याचे सांगितले. गोरक्षा व राममंदिराबाबत सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाही. आपल्या विचारांचे शासन सत्तेत आल्यावर बऱ्याच समस्या दूर होतील, असे वाटत होते. परंतु असे पूर्णपणे झालेले नाही. संस्कृतसारखी देशाची भाषा दुर्लक्षितच आहे, असे ते म्हणाले. यावेळी संघ परिवारातील समन्वयावरदेखील भाष्य केले. ‘विहिंप’कडून हिंदू समाजाला एकत्र बांधण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे संघाकडूनदेखील धर्मजागरण विभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे. अशास्थितीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे समन्वयावर जास्तीतजास्त भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. विहिंपने तयार केला देशव्यापी हिंदू सुरक्षा कृती आराखडा देशातील अनेक ठिकाणी हिंदू समाजावरील हल्ले वाढले आहे. हिंदू समाज या देशातच असुरक्षित असल्याचे दिसून येत असून, त्यांच्या सुरक्षेसाठी ‘विहिंप’तर्फे देशव्यापी हिंदू सुरक्षा कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी यासाठी चतु:सूत्री तयार करण्यात आली आहे. राममंदिराची निर्मिती ही ठरलेल्या प्रारूपानुसार रामजन्मभूमी न्यासकडूनच होईल, तसेच मंदिराची एक इंच जागाही कुणाला देणार नाही. आहे त्याच जागेवर मंदिर तयार करण्यात येईल. यासंदर्भात संसदेत कायदादेखील बनविण्यात यावा, अशी मागणी यावेळी तोगडिया यांनी केली.