शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांमुळे विकासाला गती मिळेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 02:24 IST

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचे काम होणार आहे. उद्योजक उद्योगाची निर्मिती करताना

मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन : गडचिरोली-आष्टी, गडचिरोली-मूल राष्ट्रीय महामार्गांचे भूमिपूजन गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचे काम होणार आहे. उद्योजक उद्योगाची निर्मिती करताना सर्व प्रथम दळणवळण, ऊर्जा याबाबी लक्षात घेतात. रस्त्यांच्या निर्मितीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे मार्ग खुले होतील. उद्योजक उद्योग स्थापण्यासाठी तयार होतील. गावात रस्ता गेला तर गावाला शिक्षण, आरोग्याच्या सुविधेसोबतच बाजारपेठेची सुविधा उपलब्ध होते. त्याचा फायदा शहरालासुध्दा होतो. राष्ट्रीय महामार्ग असेल तर त्या भागात उद्योगाचे दालन, व्यवसाय, व्यापार आदी गोष्टी वाढण्यास मदत होते. तसेच असा भाग इतर भागासोबत जोडला जातो व रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. त्यामुळे रस्ते हे सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देण्याचे साधन आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने गडचिरोली ते मूल, गडचिरोली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गाच्या भुमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, आमदार मितेश भांगडीया, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगीता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, रेखा डोळस, भाजपचे गडचिरोली शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, रवींद्र ओल्लालवार, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात राज्यात रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले होते. याचे श्रेय नितीन गडकरींना जाते. त्यांच्या नेतृत्वात राज्याचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आता सुरू झाले. सुरुवातीच्या काळात नागपूरवरून गडचिरोलीला जाण्याकरीता चार-पाच तासांचा वेळ लागत होता. तर नागपूरवरून सिरोंचा येथे जाण्यासाठी पूर्ण दिवस जात होता. मात्र आता आपण नागपूरवरून गडचिरोलीला केवळ अडीच तासात पोहचू शकतो. केवळ नागपूर - गडचिरोलीच नाही तर अहेरी, सिरोंचा आदी दुर्गम भागातील रस्तेसुध्दा युती सरकारच्या काळात झाले आहे. विकासाकरीता कनेक्टीव्हिटीची गरज असते. गडचिरोलीत १२ हजार कोटी रुपयांचे रस्ते होत आहेत, याचा आनंद आहे. सर्व रस्त्यांच्या माध्यमातून विकास करणे शक्य आहे. रस्ते झाले तर येथे उद्योग येतील. उद्योगांना मूलभूत गरजा जसे रस्ते, पाणी, वीज आदी गोष्टी उपलब्ध करून दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात वनोपजांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी रामदेव बाबा यांना या भागात बोलाविण्यात येणार आहे. त्यांनीसुध्दा त्यास होकार दिल्यामुळे आता युवकांच्या हातांना काम मिळू शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय गृहराज्यमंत्रीपद या भागात आल्यामुळे नामदार हंसराज अहिर यांच्या प्रयत्नातून ३ हजार कोटी रुपयांचा विशेष आराखडा या भागासाठी तयार करण्यात आला आहे. गोदावरी नदीवरील पूल हे राज्यातील सर्वाधिक लांबीचे पूल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी म्हणाले की, गरीब जनतेला रोटी, कपडा, मकान या गोष्टी उपलब्ध होतील तेव्हाच देशाचा विकास होईल. याबाबीवर केंद्र शासनाचा विश्वास असून त्यानुसार केंद्र शासन योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. गरीबांच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. गडचिरोली जिल्हा हा साधन संपत्तीने श्रीमंत असला तरी या जिल्ह्याच्या विकासाकडे आजपर्यंतच्या सरकारचे दुर्लक्ष झाले. भाजप सरकार मात्र विशेष लक्ष देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन गडकरी दिले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, यापूर्वी गडचिरोली जिल्ह्याला १२ कोटी रूपये उपलब्ध होत होते. आता मात्र १२ हजार कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. केंद्र व राज्य शासनातील सर्वच मंत्री गडचिरोली जिल्ह्यावर विशेष प्रेम करीत असल्याने या जिल्ह्याच्या विकासासाठी ते प्रयत्न करीत आहेत. आजपर्यंत येथील गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना इतर जिल्ह्यातील नागरिक भित होते. आता मात्र याच राष्ट्रीय महामार्गावरून गडचिरोली जिल्ह्यात उद्योग व्यापार करण्यासाठी बाहेर जिल्ह्यातील लोक येतील, असे प्रतिपादन अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना रस्त्यांच्या निर्मितीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उत्तरांचल व जम्मू-काश्मीर राज्याच्या धरतीवर कर सवलत देण्यात यावी, अशी मागणी उपस्थित मंत्र्यांकडे खासदारांनी केली. आमदार डॉ. होळी यांनी मार्गदर्शन करताना गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय द्यावे, गोंडवाना विद्यापीठाला जागा उपलब्ध करून द्यावी, योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अनुभवी अधिकारी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. कार्यक्रमाला जवळपास १० हजारवर नागरिक उपस्थित होते. गडचिरोली बायपाससाठी २०० कोटींचा निधी गडचिरोली शहरातून चारही मुख्य मार्ग जातात. त्यामुळे शहरात नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. रस्ते दुरूस्ती व राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी शासनाने १२ हजार कोटी रूपये मंजूर केले आहेत. मात्र यामध्ये गडचिरोली शहरातील बायपास मार्गाचा समावेश नाही. बाब प्रकर्षाने खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिली. शहराच्या विकासासाठी बायपास मार्ग असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन नामदार गडकरी यांनी बायपाससाठी अतिरिक्त २०० कोटी रूपये मंजूर केले आहेत. सदर बायपास मार्ग गडचिरोलीच्या बाहेरून १३ किमी अंतराचा राहणार आहे. सदर बायपास मार्ग चारही राष्ट्रीय महामार्गाला गडचिरोली शहराच्या बाहेरून जोडणार आहे. बायपास मार्गामुळे गडचिरोली शहरातील वाहतुकीची समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.