शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांशिवाय रस्ता सुरक्षा अशक्य

By admin | Updated: January 23, 2016 01:40 IST

एस. पी. फासे यांचे प्रतिपादन : आरमोरी व आलापल्ली येथे रस्ता सुरक्षाविषयी मार्गदर्शन

एस. पी. फासे यांचे प्रतिपादन : आरमोरी व आलापल्ली येथे रस्ता सुरक्षाविषयी मार्गदर्शनआरमोरी/ आलापल्ली : दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. अपघात एक समस्या बनत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशावेळी वाहतूक सुरक्षा बाळगणे आवश्यक आहे. ही सुरक्षा वाहतूक नियमांशिवाय अशक्य आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी एस. पी. फासे यांनी केले. आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून एस. पी. फासे बोलत होते. आलापल्ली येथीलही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आरमोरी येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक प्र. प्र. इंगवले, पीएसआय एन. बी. बच्चलवार, उपप्राचार्य डॉ. रमेश ठोंबरे, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. नोमेश मेश्राम, प्रवीण रहाटे उपस्थित होते. यावेळी इंगवले यांनी वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले. संचालन प्रा. डॉ. विजय रैवतकर तर आभार प्रा. शशिकांत गेडाम यांनी मानले. किशोर हजारे, प्रा. राजेंद्र घोनमोडे, छगन मुंगमोडे, ज्ञानेश्वर ठाकरे, पराग मेश्राम, सीमा नागदेवे, मनोज ठवरे, जयेश पापडकर, टी. के. किरणापुरे, गौतम यांनी सहकार्य केले. आलापल्ली येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. आर. डोंगे होते. मार्गदर्शक म्हणून एआरटीओ एस. पी. फासे, प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश दुर्गे, रोमित तोंबर्लावार उपस्थित होते. वाहतूक सुरक्षा म्हणून वाहन चालविताना हेल्मेट, शीटबेल्टचा वापर करावा. मागील वर्षात जिल्ह्यात ११८ अपघात होऊन ११६ जणांना आपला जीव गमवावा लागला. देशात एका मिनीटात एक दुर्घटना घडत असून चार मिनीटात एका जणाचा मृत्यू होतो. त्यामुळे वाहतूक नियम पाळावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान डोंगे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला आयटीआयमधील निदेशक व प्रशिक्षणार्थी हजर होते. (वार्ताहर)