शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्र कोरडे; धान पीक करपले

By admin | Updated: April 29, 2015 01:40 IST

जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून धानपीक अनेक शेतकरी काढतात. खरीप हंगामात संपूर्ण शेती क्षेत्रात धानपिकाची लागवड केली जाते.

मानापूर/ देलनवाडी : जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून धानपीक अनेक शेतकरी काढतात. खरीप हंगामात संपूर्ण शेती क्षेत्रात धानपिकाची लागवड केली जाते. तसेच उन्हाळी हंगामातही धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. आरमोरी तालुक्यातील वैरागड, मानापूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खोब्रागडी नदीघाटावर उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. परंतु खोब्रागडी नदीपात्र कोरडे झाल्याने धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे धान लागवडीचे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी विविध जातींच्या धानाची लागवड करीत असतात. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र धान लागवडीखाली असतो. त्यानंतर सुरू होणाऱ्या रबी हंगामात बहुतांश शेतकरी तैलवर्गीय तसेच डाळ वर्गीय पिकांची लागवड करतात. त्यानंतर उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते. उन्हाळ्यात बहुतांश शेतकरी मध्यमप्रतिच्या धानाची लागवड करतात. मानापूर परिसरातील देलनवाडी, मानापूर, सुकाळा, मोहझरी तसेच वैरागड परिसरातील करपडा, लोेहारा आदी गावांसह इतर गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी खोब्रागडी नदीलगत उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. सध्या पीक जोमात येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकाला फुटवेही येत आहेत. परंतु नदीचे पात्र आटत असल्याने धानपीक अडचणीत आले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी नदीत पंप लावून शेतीला पाण्याची व्यवस्था केली. परंतु नदीतील पाण्याची पातळी आणखीच खोलवर गेल्याने शेतीला पाणी पुरवठा करतांना अडचणी येत आहेत. परिणामी ज्या शेतकऱ्यांकडे विहीर अथवा अन्य जलस्त्रोत नाहीत. असे शेतकरी दुहेरी संकटात सापडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला पाणीपुरवठा करण्यासाठी वेगळी प्रणाली राबवावी, अशी मागणी होत आहे. पाण्याची पातळी आणखीच खोलवर गेल्याने नदी पात्रात निर्माण करण्यात आलेले पंप पाणीपुरवठा करण्यास असमर्थ आहेत. याचा फटका शेतकऱ्यांच्या उन्हाळी धानपिकाला बसत आहे. अनेक शेतातील धानपीक करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्यास आडकाठी येत आहे. (वार्ताहर)