शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी ११ लाखांचा महसूल

By admin | Updated: May 8, 2016 01:19 IST

स्थानिक उपप्रादेशिक कार्यालयाने सन २०१६ च्या एप्रिल महिन्यात वाहन तपासणी, परवाना व नोंदणी इतर कामकाजातून

महिनाभरातील कामगिरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झाले मालामालगडचिरोली : स्थानिक उपप्रादेशिक कार्यालयाने सन २०१६ च्या एप्रिल महिन्यात वाहन तपासणी, परवाना व नोंदणी इतर कामकाजातून संबंधित वाहनधारकांकडून एकूण १ कोटी ११ लाख ९८ हजार ५६ रूपयांचा महसूल गोळा केला. या उत्पन्नातून उपप्रादेशिक कार्यालय मालामाल झाले असून सदर निधी शासनाकडे वळता करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गडचिरोली तालुक्यापासून कोरची ते सिरोंचा भागातील शेकडो वाहनधारक दररोज आपली वाहने घेऊन नुतनीकरण, परवाना नोंदणी, विमा, खरेदी-विक्री वाहन नोंदणी तसेच वाहनांचे आयुर्मान वाढविणे आदी कामांसाठी येत असतात. या सर्व कामांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संबंधित वाहनधारकांना शासनाच्या नियमानुसार कराचा शुल्क अदा करावे लागते. या शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला लाखो रूपयांचे उत्पन्न आठवडाभरात मिळत असते. गडचिरोली उपप्रादेशिक कार्यालयाला आयएमव्ही शुल्क व सीएफ शुल्काच्या माध्यमातून २०१६ च्या एप्रिल महिन्यात एकूण १६ लाख ५२ हजार ७२० रूपयांचा महसूल प्राप्त झाला. बीएमव्ही, एलमएव्ही तसेच ग्रीन टॅक्स व इतर शुल्काच्या माध्यमातून उपप्रादेशिक कार्यालयाला एकूण ९५ लाख ४५ हजार ३३६ रूपयांचा महसूल प्राप्त झाला. गडचिरोली उपप्रादेशिक कार्यालयाने सन २०१५-१६ या वर्षात शासनाकडून मिळालेल्या उद्दीष्टापेक्षा १० टक्के अधिक महसूल प्राप्त करून उत्पन्नात आघाडी घेतली आहे. राज्य शासनाचा उपप्रादेशिक परिवहन विभाग महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शासनाला महसूल प्राप्त करून देत असतो. उपप्रादेशिक कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. येथील रिक्त पदे भरावीत अशी मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)वायुवेग पथकाने वसूल केला २० लाखांचा दंड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीच्या वायूवेग पथकाने एप्रिल महिन्यात शेकडो वाहनांची थेट मार्गावर तपासणी करून संबंधित वाहनधारकांकडून तडजोड शुल्क व इतर कर मिळून एकूण २० लाख २७ हजार रूपयांचा दंड वसूल केला. यामध्ये ८ लाख ७ हजार तडजोड शुल्क व १२ लाख २० हजार रूपयांच्या कराचा समावेश आहे. वायूवेग पथक वर्षभरात कोट्यवधी रूपयांचा दंड वसूल करतो.परवान्याच्या माध्यमातूनही लाखोंचे उत्पन्नदिवसेंदिवस गडचिरोली जिल्ह्यात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नवे वाहनधारक शिकाऊ तसेच कायमस्वरूपी वाहनचालक परवान्यासाठी उपप्रादेशिक कार्यालयात गर्दी करीत आहेत. परवान्यासाठी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत संबंधित वाहनधारकांवर शुल्क आकारले जाते. या माध्यमातून गडचिरोलीचे उपप्रादेशिक कार्यालयाने एप्रिल महिन्यात हजारो रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.