सेवानिवृत्त शिक्षक व अधिकाऱ्यांना निराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST2021-02-05T08:53:22+5:302021-02-05T08:53:22+5:30

धानाेरा : दुधमाळा केंद्रातील शिक्षक व धानाेरा गटसाधन केंद्रातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करून निराेप देण्यात आला. ...

Retirement of retired teachers and officers | सेवानिवृत्त शिक्षक व अधिकाऱ्यांना निराेप

सेवानिवृत्त शिक्षक व अधिकाऱ्यांना निराेप

धानाेरा : दुधमाळा केंद्रातील शिक्षक व धानाेरा गटसाधन केंद्रातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करून निराेप देण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी छत्रपती मडावी, जि. प. उच्च प्राथमिक शाळा दुधमाळा येथील मुख्याध्यापक तथा पदवीधर शिक्षक लालाजी उसेंडी शिक्षक बाजीराव पदा हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करून व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी व्ही. आर. आरवेली हाेते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर आखाडे, दादाजी खोब्रागडे, उकंडराव राऊत, कोहळे, केंद्रप्रमुख सदानंद ताराम उपस्थित होते. सदानंद ताराम यांनी सेवानिवृत्तांचा गाैरवपूर्ण उल्लेख केला. तसेच शिक्षकांनी मनाेगतातून आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक मडावी तर आभार शेडमाके यांनी मानले.

Web Title: Retirement of retired teachers and officers