महागाव-अहेरी मार्गाची दुरुस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST2021-05-10T04:36:57+5:302021-05-10T04:36:57+5:30

अहेरी तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर महागाव हे गाव आहे. महागाव परिसरातील नागरिकांना विविध कामे करण्यासाठी अहेरी येथे जावे ...

Repair of Mahagaon-Aheri road stalled | महागाव-अहेरी मार्गाची दुरुस्ती रखडली

महागाव-अहेरी मार्गाची दुरुस्ती रखडली

अहेरी तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर महागाव हे गाव आहे. महागाव परिसरातील नागरिकांना विविध कामे करण्यासाठी अहेरी येथे जावे लागते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ६ किमीचे अंतर पार करण्याकरिता अर्धा तास लागताे. महागाव - अहेरी मार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. परंतु, या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी या मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर रस्त्याची केवळ डागडुजी झाली. पक्की दुरुस्ती झाली नाही. महागाव मार्गावरून छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून अवजड वाहतूक केली जात आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले. मात्र, अद्याप त्यांची डागडुजी झाली नाही. केवळ २ किमी मार्गाची डागडुजी केली. मात्र, ५ किमी रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Repair of Mahagaon-Aheri road stalled