निमलगुडम वन संरक्षण समितीचे पुनर्गठण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST2021-04-14T04:33:09+5:302021-04-14T04:33:09+5:30

वन विभाग व गावाला जोडणारा केंद्रबिंदू म्हणून वन समिती नेमली जाते. सदर समितीच्या माध्यमातून वनावर आधारित कामे करणे, गाैणवनाेपज ...

Reorganize the Nimalgudam Forest Conservation Committee | निमलगुडम वन संरक्षण समितीचे पुनर्गठण करा

निमलगुडम वन संरक्षण समितीचे पुनर्गठण करा

वन विभाग व गावाला जोडणारा केंद्रबिंदू म्हणून वन समिती नेमली जाते.

सदर समितीच्या माध्यमातून वनावर आधारित कामे करणे, गाैणवनाेपज खरेदी करणे, गावात आर्थिक प्राप्तीचे प्रकल्प राबविणे, अनुदानावर गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे, गावात विकासात्मक कामे हाती घेणे, असे नियोजन समितीचे असते. यापूर्वी समितीच्या माध्यमातून वनातील कामे, गावात प्रत्येक कुटुंबात गॅस कनेक्शन, गावात समाजोपयोगी भांडे, पडदे, साउंड सिस्टम खरेदी करून गावाला उपलब्ध करून दिले होते; परंतु आजघडीला वन संरक्षण समिती निमलगुडम समिती नाममात्र असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत झालेल्या लाभातून समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी अनेक गावोपयोगी वस्तू व कामाचा ठराव मांडले; परंतु आश्वासनांशिवाय काहीच लाभ झाला नाही, तर समितीची लाभ रक्कम गेली कुठे? असा प्रश्न समितीला व गावकऱ्यांना पडला आहे.

गेल्या एक वर्षापासून समितीची कोणत्याही प्रकारची सभा घेतली नाही, तसेच समितीला मिळणाऱ्या लाभांची माहितीसुद्धा देण्यात आले नाही. वन संरक्षण समितीचे सचिव पद कमलापूरचे क्षेत्रसहायक बी.बी. निमरड यांच्याकडे सदर सचिवपद राजारामचे क्षेत्र सहायक ए.बी. राखडे यांना देण्यात आले नाही. करिता सदर समितीचे सचिवपद त्वरित बदलवून द्यावे, समितीचे पदाधिकारी व सदस्य गण पुनर्गठन करण्यास त्वरित आदेश द्यावा. आपण कारवाई न केल्यास समिती बरखास्त करण्यात येईल व वरिष्ठ स्थरावर निवेदन देऊन न्याय मागण्यात येईल, असा इशारा वन समितीच्या शिष्टमंडळ व निमलगुडम गावकऱ्यांनी दिला आहे. निवेदन देताना समितीचे शिष्टमंडळ आनंदराव कोडापे, नागेश शिरलावार, नागेश कोडापे, कैलास पोरतेट, सीताराम पेंदाम, सत्यवान आत्राम आदी हजर हाेते.

===Photopath===

130421\13gad_1_13042021_30.jpg

===Caption===

वनपिरक्षेत्राधिकारी यांना निवेदन देताना निमलगुडम येथील नागरिक. 

Web Title: Reorganize the Nimalgudam Forest Conservation Committee