शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गोदामे भाड्याने घेणार

By admin | Updated: April 5, 2017 01:26 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाते. मात्र जिल्ह्यातील गोदामांची साठवण क्षमता कमी

आदिवासी विकास महामंडळ : पाच जिल्ह्यांसाठी योजना गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाते. मात्र जिल्ह्यातील गोदामांची साठवण क्षमता कमी असल्याने भाड्याने गोदामे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील गडचिरोली, गोंदिया, नागपूर, पालघर व ठाणे या पाच आदिवासी बहूल जिल्ह्यांमध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धानाची खरेदी केली जाते. दरवर्षी या पाच जिल्ह्यांमधून सुमारे १२ लाखा क्विंटल धान व इतर धान्याची खरेदी करण्यात येते. मात्र गोदामांची साठवण क्षमता केवळ ७.८० लाख क्विंटल एवढी मर्यादित आहे. सुमारे ५ लाख क्विंटल धान्य नाईलाजाने उघड्यावर ठेवावे लागते. उन्हाळभर धान्याची खरेदी केली जाते. जून महिन्यात पावसाळ्याला सुरूवात होते. तोपर्यंत धानाची भरडाई होत नाही. उघड्यावर ठेवलेल्या पाच क्विंटल धान्यापैकी बरेच धान्य पावसामुळे खराब होते. हा अनुभव आदिवासी विकास महामंडळ व राज्य शासनाला दरवर्षी येतो. यामुळे राज्य शासनाला दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा तोटा सहन करावा लागतो. तरीही आदिवासी शेतकऱ्यांच्या हितासाठी तोटा सहन करून सदर योजना दरवर्षी राबविली जात आहे. मात्र दरवर्षी तोटा सहन करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन धान साठविण्यासाठी आवश्यक असलेले गोदाम १० वर्षांसाठी भाडे तत्वावर घेतली जाणार आहेत. शासनाला आवश्यकता वाटल्यास करारामध्ये आणखी वाढ केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात सहकारी संस्था, खासगी व्यक्तींची गोदामे उपलब्ध आहेत. गोदाम भाडेतत्वावर घेतल्याने गोदाम देखभाल व व्यवस्थापनाचा खर्च शासनाला करावा लागणार नाही. गडचिरोली जिल्ह्यातही भाडेतत्वावर गोदामे घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील हजारो क्विंटल धान पावसाने खराब झाले. त्यामुळे शासनाला कोट्यवधी रूपयांचा फटका बसला होता. (नगर प्रतिनिधी)