शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडात हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 01:05 IST

कुरखेडा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले.

आमदार उपस्थित : नगरभवनाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरूकुरखेडा : कुरखेडा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील प्रमुख ११ ठिकाणी लावण्यात आलेल्या हायमॉस्ट दिव्यांचे लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक गांधी चौकात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल होते. ग्रामीण क्षेत्राप्रमाणे नगर पंचायत क्षेत्रात सुध्दा रोजगार हमी योजना व शेती विषयक योजनांची अंमलबजावणी करण्यास शासन सकारात्मक असून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार गजबे यांनी यावेळी सांगितले. याशिवाय प्रत्येक तालुकास्तरावरील नवनिर्मित नगर पंचायत भवनाच्या बांधकामाचा आराखडा तयार करण्याचे कार्य शासनस्तरावर सुरू असल्याची माहिती आमदार गजबे यांनी दिली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा सचिव विलास गावंडे, गटनेते व पाणी पुरवठा सभापती रवींद्र गोटेफोडे, उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, बांधकाम सभापती सोनू भट्टड, नगरसेवक बबलूभाई हुसैनी, अ‍ॅड. उमेश वालदे, पुंडलिक देशमुख, मनोज सिडाम, नगरसेविका शाहीदा मुगल, नंदिनी दखणे, दिपाली देशमुख, वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता उजवणे, कंत्राटदार कुंभारे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते हायमास्ट दिव्याची कळ दाबून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी यांनी प्रास्ताविकेतून शहरातून आतापर्यंत झालेल्या व प्रस्तावित विकासकामांची चर्चा करून यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदारांकडे केली. कार्यक्रमाचे संचालन पं.स. सदस्य चांगदेव फाये यांनी तर आभार मुख्याधिकारी मयूर भूजबळ यांनी मानले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.