शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी ३७ लाखांच्या कामांना मान्यता

By admin | Updated: October 27, 2014 22:35 IST

सन २०१४- १५ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या रस्ते, गटारे व अन्य मूलभूत सुविधांच्या १ कोटी ३७ लाख रूपयांच्या कामांना १९ आॅक्टोबर रोजी राज्याच्या ग्रामविकास

गडचिरोली : सन २०१४- १५ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या रस्ते, गटारे व अन्य मूलभूत सुविधांच्या १ कोटी ३७ लाख रूपयांच्या कामांना १९ आॅक्टोबर रोजी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने मान्यता प्रदान केली आहे. सदर मंजूर कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणार आहेत. गडचिरोली तालुक्यात पारडी येथे ५ लाख रूपयांचे सिमेंट काँक्रिट रस्ता, इंदाळा येथे ५ लाख रूपयांचे सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम, नवेगाव (मुरखळा) ५ लाख रूपयांचे नाली बांधकाम व मेंढा येथे ५ लाख रूपयांचे नालीबांधकाम आदी कामांचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यात नवरगावनजिकच्या बांधोणा येथे ५ लाख रूपयांचा सिमेंटरस्ता, गिलगाव येथे ५ लाख रूपयांचा सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम होणार आहे. धानोरा तालुक्यात सोडे, गट्टा, गोडलवाही, आष्टी आदी चार ठिकाणी प्रत्येकी पाच लाख रूपयांचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. सिरोंचा तालुक्यात सोनमप, जानमप, पातागुड्डम, कोर्ला, कोपेला, बोरी, राजपूर, आष्टी आदी आठ गावांमध्ये प्रत्येकी पाच लाख रूपयांचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. अहेरी तालुक्यात बोरी, राजपूर आदी गावांत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. मुलचेरा तालुक्यात मोऱ्हाली, देशबंधूग्राम आदी गावांत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. कुरखेडा तालुक्यात सावलखेडा येथे सिमेंट काँक्रिट रस्ता तसेच कुरखेडा येथे जुन्या बसस्थानकाजवळ महिला शौचालय बांधकाम व गुरूनोली येथे मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम होणार आहे. अहेरी तालुक्यात आलापल्ली येथे सिमेंट काँक्रिट रस्ता, मेडपल्ली येथे सिमेंट काँक्रिट रस्याचे काम होणार आहे. सदर मंजूर कामासाठी देण्यात येणार निधी हा मंजूर कामाच्या यादीसह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात येईल. या कामांसाठी ३ मे २०११ च्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा काढणे, स्वीकारणे आदी बाबतची कार्यवाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित सर्व ग्रामपंचायतीची राहील, असेही २६ आॅगस्ट २०१४ च्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयात नमुद आहे. २५१५ अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार असल्याने गावाचा विकास साधण्यास मदत होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)े