शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारी पाच आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा

By admin | Updated: May 4, 2016 02:31 IST

प्रेमाचे आमिष दाखवून चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर गावालगतच्या जंगल परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन

गडचिरोली : प्रेमाचे आमिष दाखवून चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर गावालगतच्या जंगल परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीस १४ वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंड तसेच त्याच्या सहकारी चार आरोपींना तीन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी मंगळवारी सुनावली.विद्यासागर हरिश्चंद्र धोती (२८) रा. अनंतपूर ता. चामोर्शी असे शिक्षा झालेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. गुरूदास यमाजी दलाई रा. अनंतपूर, लोकसिंग मंगस्पद धोती, पतिराम ऋषी नेवारे रा. कुदर्शीटोला, गुलाबसिंग यांचा सहकारी आरोपींमध्ये समावेश आहे. सदर प्रकरणाची तक्रार पीडित मुलीच्या वडिलाने चामोर्शीच्या पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर चामोर्शी पोलिसांनी आरोपी विद्यासागर धोती, गुरूदास दलाई, गुलाबसिंग धोती, लोकसिंग व पतिराम नेवारे या पाच जणांवर भादंविचे कलम ३७६, ३६३, ३६६ व सह कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपत्र दाखल केले. या प्रकरणात सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी साक्षीपुरावे तपासून व दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून या प्रकरणातील मुख्य आरोपी विद्यासागर धोती याला भादंविचे कलम ३६३ अंतर्गत तीन वर्ष सश्रम कारावास, कलम ३६६ अंतर्गत चार वर्ष कलम ३७६ अन्वये सात वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. उर्वरित चार आरोपींना तीन वर्ष सश्रम कारावास व एक हजार रूपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनिल प्रधान यांनी या खटल्यात काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)अनंतपूरपासून मंचेरियलपर्यंत असा घडला प्रकार४१८ जानेवारी २०१० रोजी पीडित शाळकरी मुलगी दुपारच्या सुटीत शाळेच्या मागील जंगल परिसरात शौचास गेली. दरम्यान, विद्यासागर हरिश्चंद्र धोती याने तिला पे्रमाचे आमिष दाखवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला व तिला रात्रभर जंगलात ठेवले. त्यानंतर गुरूदास दलाई याला फोन करून सुमो जीप आणण्यास सांगितले. त्यानंतर लोकसिंग धोती हा टाटासुमो व कपड्याचे सुटकेस घेऊन सदर जंगल परिसरात आला व त्याने पाच हजार रूपये विद्यासागर याला दिले. त्यानंतर विद्यासागर हा पीडित मुलीला घेऊन आंध्र प्रदेशाच्या मंचेरियल येथे गेला व सदर मुलीवर त्याने अत्याचार केला. गुलाबसिंग धोती हा विद्यासागर धोती याला पैशाचा पुरवठा करीत होता. पतिराम नेवारे याने विद्यासागर याला कपडे व पाच हजार रूपये नेऊन दिले. त्यानंतर विद्यासागर हा पीडित मुलीला भाड्याच्या खोलीवर ठेवून तब्बल दीड वर्ष तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलगी गर्भवती राहिली व तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर विद्यासागर हा पीडित मुलीला मारहाण करून त्रास देत होता.