शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत बिलांबाबत पडला तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

२४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी संचारबंदी सुध्दा लागू करण्यात आली. मिटरचे रिडींग घेणे बंद करण्यात आले. तसेच वीज ग्राहकांना कागदी बिल सुध्दा पोहोचविले जात नव्हते. मार्च ते मे महिन्याचे बिल सरासरी पाठविले जात होते. काही ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केला. काही ग्राहकांनी मात्र तिनही महिन्यांचे वीज बिल भरले नाही.

सहा हजार अर्ज : ऑनलाईन संवादातून शंका समाधानाचा प्रयत्नलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनच्या कालावधीतील तीन महिन्यांचे वीज बिल ग्राहकांना एकाच वेळी जून महिन्यात प्राप्त झाले. वीज वापरापेक्षा अधिकचे बिल आल्याचा संशय ग्राहकांना असल्याने महावितरणकडे तक्रारी वाढल्या. जिल्हाभरातील सुमारे ५ हजार ७७० ग्राहकांनी वीज बिलाबाबत तक्रारी केल्या आहेत.२४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी संचारबंदी सुध्दा लागू करण्यात आली. मिटरचे रिडींग घेणे बंद करण्यात आले. तसेच वीज ग्राहकांना कागदी बिल सुध्दा पोहोचविले जात नव्हते. मार्च ते मे महिन्याचे बिल सरासरी पाठविले जात होते. काही ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केला. काही ग्राहकांनी मात्र तिनही महिन्यांचे वीज बिल भरले नाही. जून महिन्यात मीटर रिडींग करण्यात आली. त्यानंतर तीन महिन्यांचे एकाच वेळी वीज बिल पाठविण्यात आले. आपल्या वापरापेक्षा अधिकचे बिल पाठविण्यात आले, असा संशय ग्राहकांना असल्याने ग्राहकांची ओरड सुरू झाली. ग्राहकांच्या तक्रारींचे समाधान करण्यासाठी महावितरणने उपविभाग, विभाग व प्र-विभाग कार्यालय स्तरावर तक्रार निवारणासाठी वेबिनार आयोजित केले. तसेच ग्राहकांना लेखी तक्रारही करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्हाभरातील ७९ ग्राहकांनी आॅनलाईन तक्रारी दाखल केल्या तर ५ हजार ६९२ नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तक्रार अर्ज सादर केले आहेत. तक्रारींचे निरसन करण्यासाठी उपविभाग, विभाग व प्र-विभागस्तरावर स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. वीज बिल प्राप्त होऊन आता महिनाभराचा कालावधी उलटला तरी अजुनही वीज ग्राहकांच्या तक्रारींचा ओघ सुरू आहे.महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्याच्या कालावधीत वीज बिलाबाबत एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाभरात २० जुलैपर्यंत ३२ वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वाधिक तक्रारी गडचिरोली उपविभागातगडचिरोली उपविभागात गडचिरोली शहराचा समावेश आहे. गडचिरोली शहराची लोकसंख्या ६० हजारच्या जवळपास असून ३० हजार पेक्षा अधिक ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक ग्राहकांची संख्या सुध्दा अधिक आहे. गडचिरोली उपविभागात जुलै महिन्यात वीज बिलाबाबत सुमारे ३ हजार २३६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्वच तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे.तुटलेल्या विजेच्या ताराला स्पर्श करू नकापावसाळ्यात वादळ, वारा, पाऊस यामुळे खांबांवरील विजेच्या तारा तुटून पडतात. वीज तारांना स्पर्श झाल्याने नागरिक मृत्यूमुखी पडल्याच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात घडल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी शेतात किंवा गावात विजेचे तार लोंबकळत असेल किंवा जमिनीवर पडले असेल तर त्या ताराला स्पर्श करू नये. याबाबतची माहिती तत्काळ महावितरणला कळवावी. गावातील विद्युत खांबाला जनावरे बांधू नये. घराचे बांधकाम वीज तारांपासून काही दूर अंतरावर करावे. घरी असलेल्या विद्युत उपकरणांची अर्थिंग बरोबर आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन महावितरण गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे व कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी केले आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण