शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

ग्रामसभांचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व.डॉ. ब्रह्मदेव शर्मा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शुक्रवार ६ डिसेंबर रोजी घोडेझरी येथे ग्रामसभांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. खुटगाव आणि झाडा भापडा इलाख्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पेसा आणि वनहक्क कायदा-माहिती व अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्दे१० इलाख्यातील ग्रामसभांची अपेक्षा : पेसाचे जनक डॉ.ब्रह्मदेव शर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त घोडेझरीत कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामसभांना पेसा कायद्याचा अधिकार मिळाला असला तरी अंमलबजावणी झाली का? होत आहे का? याबाबत ग्रामसभेची भूमिका काय? या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शुक्रवारी धानोरा तालुक्यातील घोडेझरी येथे १० इलाख्यातील ग्रामसभांचा मेळावा झाला. यात पेसा कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून प्रशिक्षण मिळावे, अशी अपेक्षा इलाख्यांचे मार्गदर्शक देवाजी पदा व इतर वक्त्यांनी व्यक्त केली.ग्रामसभांचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व.डॉ. ब्रह्मदेव शर्मा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शुक्रवार ६ डिसेंबर रोजी घोडेझरी येथे ग्रामसभांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. खुटगाव आणि झाडा भापडा इलाख्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पेसा आणि वनहक्क कायदा-माहिती व अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना पदा म्हणाले, स्व.डॉ.शर्मा यांनी आदिवासी समाजाचे शोषण कमी करून त्यांना मिळालेले हक्क त्यांच्यापर्यंत पोहोचवावे याकरिता प्रशिक्षण, आंदोलने, मेळावे, धरणे, उपोषणे करून ‘मावा नाटे, मावा राज’ ही घोषणा देऊन आदिवासींचे अधिकार व हक्काची जाणीव करून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. पेसा व वनहक्क कायदा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतू सध्यातरी लोक तेंदू मंजुरी व बोनस एवढ्यापुरताच विचार करत आहेत. त्याच्या पुढे पेसा कायदा लोकांना समजावून देण्याची गरज असल्याचे पदा म्हणाले. ग्रामसभा सक्षम करणे महत्वाचे आहे. गेल्या १५ वर्षांपासून घोडेझरी ग्रामसभा पेसा कायदा प्रशिक्षणाचा छोटोसा प्रयत्न करत आहे. परंतू हा प्रयत्न पुरेसा नसून संपूर्ण जिल्ह्यात अधिक प्रमाणात वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील खुटगाव, झाडा भापडा, भामरागड, पोटेगाव, दूधमाळा, धानोरा, एटापल्ली व जारावंडी या १० इलाख्यातील जवळपास २ हजार लोक उपस्थित होते. त्यात माजी, पोनवो, गायता आणि भूम्यांसह महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.पारंपरिक आदिवासी नृत्याचे सादरीकरणयावेळी घोडेझरी येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे बांबूपासून निर्मित सुंदर फुलांनी स्वागत केले. तसेच यावेळी आदिवासी पारंपरिक ढोलवाद्यासह युवक-युवतींनी नृत्य सादर केले. मेळाव्याला सुरूवात करण्यापूर्वी शीलालेख पुजा व इतरही कार्यक्रम झाले.असे आहे डॉ.शर्मा यांचे गडचिरोलीत योगदानमाजी आयएएस अधिकारी स्व.ब्रह्मदेव शर्मा यांनी सेवानिवृत्तीनंतर आदिम जाती आणि अनुसूचित जाती आयुक्त या पदावर नि:शुल्क का केले. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींकरिता त्यांनी पेसा व वनहक्क कायद्याबाबत मेळाव्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली. त्यांनी गावागावात गावगणराज्याची स्थापना केली. यातून आदिवासींना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत