शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मानसेवी डॉक्टरांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: January 10, 2015 01:13 IST

गडचिरोली जिल्ह्यात बदली झालेले अनेक डॉक्टर रूजू होत नाहीत. त्यामुळे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त राहत असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा लाभ नागरिकांना मिळत नाही.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात बदली झालेले अनेक डॉक्टर रूजू होत नाहीत. त्यामुळे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त राहत असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा लाभ नागरिकांना मिळत नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी मानसेवी डॉक्टरांची संख्या वाढविण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राज्य शासनाकडे सादर करणार आहेत. गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३६ आरोग्य उपकेंद्र, ७ आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथीक दवाखाने आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी दोन डॉक्टर, आरोग्य उपकेंद्र, आयुर्वेदिक, अ‍ॅलोपॅथी दवाखान्याला प्रत्येकी एक डॉक्टर देण्यात येतो. याशिवाय तीन फिरते दवाखाने आहेत. तेथेही प्रत्येकी एक डॉक्टर आहे. याशिवाय ३० मानसेवी डॉक्टर सध्या जिल्ह्यात कार्यरत आहे. यातील दोन डॉक्टरांनी नोकरी सोडलेली आहेत. जिल्ह्यात बदली झालेले अनेक एमबीबीएस डॉक्टर येथे रूजू होऊन सेवा देण्याबाबत उदासीन आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पद नेहमीच रिक्त राहतात. सद्य:स्थितीत गट अ चार व गट ब च्या दोन अशा एकूण सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची पद रिक्त आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी मानसेवी डॉक्टरांची संख्या वाढविण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळलाजिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी गुरूवारी भामरागड तालुक्याचा गुप्त दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मन्नेराजाराम आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळले. वर्ग १ चे वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार मंत्रालयस्तरावर आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.आरोग्य सेवेला दिलासा मिळेल असा विश्वासनवसंजीवनी योजनेंतर्गत राज्याच्या आदिवासी बहुल भागात मानसेवी डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात ३० डॉक्टर आहेत. त्यांना आदिवासी उपयोजनेतून प्रत्येकी सहा हजार रूपये महिना व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून प्रत्येकी १२ हजार रूपये मानधन, असे एकूण १८ हजार रूपये मानधन देण्यात येत आहे. स्थायी स्वरूपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकस्तर वेतनवाढ व नक्षलप्रोत्साहन भत्ता देऊनही ते येथे सेवा देण्यास तयार होत नाही. या पार्श्वभूमीवर मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याचा हा प्रस्ताव निश्चितच आरोग्य सेवेला दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.