शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील समस्या कायमच

By admin | Updated: September 15, 2014 00:08 IST

आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सोयी- सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ११ नोव्हेंबर २०११ रोजी नवीन शासन निर्णय

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सोयी- सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ११ नोव्हेंबर २०११ रोजी नवीन शासन निर्णय काढला असला तरी या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील एकाही वसतिगृहात सोयी- सुविधा पुरविल्या जात नाही. त्यामुळे सदर शासन निर्णय कागदावरच राहिला असून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवीन शासन निर्णयानुसार सोयी- सुविधा व जेवण पुरविण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या निवासाची व जेवणाची सुविधा मिळावी यासाठी राज्य शासनाने आश्रमशाळा ही संकल्पना पुढे आणली. प्रत्येक आश्रमशाळेमध्ये वसतिगृह बांधण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणीही इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह चालविण्यात येत आहेत. राज्यभरात जवळपास ५०० वसतिगृह आदिवासी विकास विभागाच्यावतीने चालविले जातात. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ११ जुलै १९८५ च्या परिपत्रकानुसारच सोयी- सुविधा पुरविल्या जात होत्या. २५ वर्षांच्या कालावधीत महागाईत पाच पटीने वाढ झाली, राहणीमानात बदल झाला. मात्र आदिवासी विद्यार्थ्यांना २५ वर्षांपूर्वीप्रमाणेच सोयी- सुविधा पुरविल्या जात होत्या. या अपुऱ्या असल्याने परिपत्रकामध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, पालक यांच्याकडून केली गेली. त्यानुसार शासनाने ११ नोव्हेंबर २०११ रोजी नवीन परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार क्रीडावस्तू खरेदीसाठी प्रत्येक वसतिगृहाला दरवर्षी १० हजार रूपयांचा निधी मंजूर करावा, शासकीय वसतिगृहात रंगीत टिव्ही व चॅनल पाहण्याचा खर्च म्हणून प्रतिवर्षी १० हजार रूपये मंजूर करावे, प्रत्येक शासकीय वसतिगृहात पाणी शुद्ध करण्याचे यंत्र व वाटर कुलर पुरविण्यात यावे, प्रत्येक वसतिगृहात १० विद्यार्थ्यांसाठी १ संगणक इंटरनेट सुविधेसह उपलब्ध करून द्यावा, सहा महिन्यातून एकदा पेस्ट कंट्रोल करण्यात यावा, इन्व्हर्टर लावण्यात यावे, ग्रंथालयांमध्ये सर्व प्रकारची पुस्तके असावीत, स्वतंत्र ग्रंथालय असावेत, प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचे जेवण पुरविण्यात यावे आदी तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र या परिपत्रकात दर्शविण्यात आलेल्या अर्ध्याही सुविधा वसतिगृहात पाहायला मिळत नाही. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवणसुद्धा व्यवस्थित पुरविले जात नाही. सदरबाब वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या अनेकवेळा लक्षात आणून दिली. त्यासाठी अनेकदा आंदोलनसुद्धा करण्यात आले आहे. मात्र याचा काहीही परिणाम आदिवासी विकास विभागावर झाला नाही. विद्यार्थ्यांना जुन्याच पद्धतीने सोयी- सुविधा पुरविल्या जात आहेत. वसतिगृहांची अवस्था अत्यंत बकाल झाली असून विद्यार्थ्यांना कनिष्ठ दर्जाचे जेवण पुरविले जात आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी वसतिगृहात राहण्यासाठी तयार होत नाही. बरेचशे शहरात शिकणारे विद्यार्थी किरायाच्या खोलीमध्ये राहून शिक्षण घेत आहेत. आदिवासी विकास विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी, पालक व लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. आवश्यक सोयी- सुविधा न पुरविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)