शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

देवलमरी भागातील खराब रस्त्यांची अडचण दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

व्यंकटापूरला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असले तरी रस्ता व पुलाअभावी हा भाग विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित होता. पक्के रस्ते नसल्याने या भागात राज्य परिवहन महामंडळाची बससेवाही सुरळीत चालत नव्हती. पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे सदर भागातील अनेक मार्ग बंद राहत असतात. दरवर्षीच्या पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अहेरी तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्यासह जगाशी संपर्क तुटत होता.

ठळक मुद्देपावसाळ्यात मार्ग सुरू राहणार : पूल व रस्त्याचे काम प्रगतीपथावर

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : देवलमरी-व्यंकटापूर तसेच व्यंकटापूर-लंकाचेन या मार्गाचे डांबरीकरणाचे काम सुरू असून पुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. हे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असल्याने पावसाळ्यातील सदर भागातील आवागमनाची अडचण दूर होणार आहे.व्यंकटापूर हे निसर्गरम्य व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी टाळी वाजविले की, पाण्याचे बुळबुळे बाहेर निघतात. व्यंकटापूरला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असले तरी रस्ता व पुलाअभावी हा भाग विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित होता. पक्के रस्ते नसल्याने या भागात राज्य परिवहन महामंडळाची बससेवाही सुरळीत चालत नव्हती. पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे सदर भागातील अनेक मार्ग बंद राहत असतात. दरवर्षीच्या पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अहेरी तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्यासह जगाशी संपर्क तुटत होता. हा भाग अतिदुर्गम व संवेदनशील असल्याने येथे एकही कंत्राटदार रस्ते व पुलाचे काम करण्यासाठी तयार होत नव्हते. मात्र एका कंत्राटदाराने देवलमरी-व्यंकटापूर-लंकाचेन मार्गाचे व पुलाचे काम करण्यास तयारी दर्शवून हे काम हाती घेतले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कंत्राटदाराच्या वतीने रस्ता व पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील आवागमन व दळणवळणाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने व्यंकटापूर, आवलमरी, लंकाचेन या गावातील व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक