पुरस्कार वितरणाचा मुहूर्त लांबला\

By Admin | Updated: September 5, 2016 01:28 IST2016-09-05T01:28:06+5:302016-09-05T01:28:06+5:30

शिक्षक दिन व गणेश चतुर्थी उत्सव सोमवारी एकाच दिवशी आल्यामुळे जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा लांबणीवर टाकण्यात आला आहे

The prize distribution will be a long time. | पुरस्कार वितरणाचा मुहूर्त लांबला\

पुरस्कार वितरणाचा मुहूर्त लांबला\

गडचिरोली : शिक्षक दिन व गणेश चतुर्थी उत्सव सोमवारी एकाच दिवशी आल्यामुळे जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा लांबणीवर टाकण्यात आला आहे. मात्र समितीने अजुनपर्यंत जिल्हा पुरस्कारासाठी शिक्षकांची निवडसुद्धा केली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
राज्य स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्काराचे तर जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. प्रत्येक व्यक्तीत गणरायाच्या तयारीच्या कामात व्यस्त राहतो ही बाब लक्षात घेऊन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर टाकण्यात आला आहे. जिल्हा परिषदेनेही महाराष्ट्र शासनाचीच री ओढत जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा लांबणीवर टाकला आहे. तो ९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र शिक्षकांच्या निवडीसंदर्भात अजुनपर्यंत समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे शिक्षकांची निवडसुद्धा झाली नाही. कार्यक्रम जरी लांबणीवर टाकला असला तरी शिक्षकांची निवड किमान शिक्षक दिनाच्या पूर्वी होणे अपेक्षित होते. निवड समितीने ही प्रक्रिया न केल्याने शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The prize distribution will be a long time.