शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाच्या उद्घाटन सभेची तयारी जोमात

By admin | Updated: December 26, 2016 01:29 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात दळणवळण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उत्तम दर्जाचे रस्ते निर्माण

शुक्रवारी सोहळा : राज्यपाल, मुख्यमंत्री गडचिरोलीत येणार, शामियाना उभारण्याच्या कामास प्रारंभ गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात दळणवळण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उत्तम दर्जाचे रस्ते निर्माण करण्याचे काम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने हाती घेतले आहे. याअंतर्गत नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून सात राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. या महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन ३० डिसेंबर २०१६ रोजी केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपाल डॉ. सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. या भूमिपूजन कार्यक्रमाची सभा शुक्रवारी धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रशस्त शामियाना उभारण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात रस्ते विकास योजना २००१-२०२१ राबविली जात आहे. याअंतर्गत केंद्र सरकारचे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय रस्ते निर्मितीचे काम करणार आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने सिरोंचा व तेलंगणा राज्याला जाणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाचे लोकार्पणही सिरोंचा येथे होणार आहे. त्यानंतर गडचिरोली येथे दुपारी जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेला सर्व मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गुरूवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत दिली होती. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांची सभा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय व जिल्हा प्रशासन लागले आहे. रविवारी शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात एका खासगी डेकोरेशनचे मजूर लाकडी खांब गाडण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले. सभेचा स्टेज भव्य, दिव्य राहणार असून या कामात अनेक मजूर भिडले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी) जिल्ह्यातून असे जातील महामार्ग गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरून आदिलाबाद-कोरपना-गडचांदूर-राजुरा-बामणी-गोंडपिपरी-आष्टी-आलापल्ली-हेमलकसा-भामरागड ते महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ तसेच आलापल्लीपासून अहेरी याशिवाय राष्ट्रीय महामार्ग १७-सी अंतर्गत ब्रम्हपुरी-वडसा-कुरखेडा-कोरची-देवरी-आमगाव- गोंदिया व राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी अंतर्गत साकोली-लाखांदूर-वडसा-आरमोरी-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६) ला जोडणार. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० करंजी-वणी-वरोरा-चंद्रपूर-मूल-सावली-गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव ते छत्तीसगड असा हा राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली-चिमूर या नक्षलग्रस्त भागातून जाणार आहे.