शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

खंडित वीज पुरवठा दुरूस्तीचे काम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

वादळामुळे कोरची येथील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विद्युत खांब व तारा तुटल्या. सदर वीज तारा जोडण्याचे व नवीन वीज खांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ३३ केव्ही वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता प्रफुल कुलसंगे व लाईनमन डी.सी.बाराहाते, कंत्राटी कामगार राजकुमार लांजेवार, एस.एल.सोनवने तसेच कंत्राटी कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात व्यस्त आहेत.

ठळक मुद्देकर्मचारी व्यस्त : वादळामुळे महावितरणचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : ३ जून रोजी बुधवारला कोरची शहरासह तालुक्याच्या विविध भागात वादळाने कहर केला. दरम्यान पाऊस बरसला. वादळामुळे वीज खांब वाकून तारा तुटल्या. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला. सदर खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे.वादळामुळे कोरची येथील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विद्युत खांब व तारा तुटल्या. सदर वीज तारा जोडण्याचे व नवीन वीज खांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ३३ केव्ही वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता प्रफुल कुलसंगे व लाईनमन डी.सी.बाराहाते, कंत्राटी कामगार राजकुमार लांजेवार, एस.एल.सोनवने तसेच कंत्राटी कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात व्यस्त आहेत. वादळामुळे कोरची येथे १२ वीज खांब तुटले. ४० ठिकाणच्या विद्युत खांबांच्या तारा व इन्सुलेटर तुटल्या. परिणामी शहरासह ग्रामीण भागाचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. गावातील विद्युत लाईनवर झाडे उन्मळून पडल्याने वीज तारा तुटल्या होत्या. दुरूस्तीच्या कामाला ४ जूनपासून महावितरणच्या वतीने सुरूवात करण्यात आली. ४ जून रोजी सायंकाळपासून कोरची शहरातील वीज पुरवठा सुरळीत झाला. शहरानंतर वीज कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळविला. जीर्ण झालेले वीज खांब अधिक वाकले. असे गंजलेले वीज खांब बदलवून नवीन खांब उभारण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. या ठिकाणी हे काम केले जात आहे, त्या ठिकाणची डीपी बंद केली जात आहे. दिवसभर भर उन्हात वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहेत.

टॅग्स :electricityवीज