शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार तास वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

आठवडाभरापासून जिल्हाभर काही ठिकाणी रिपरिप तर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. अहेरी उपविभागातही जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अहेरी शहरातील तहसील कार्यालय मार्गावर झाड कोसळले. अंतर्गत रस्त्यावरील पडलेले झाड उपचलण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची आहे. विद्युत कार्यालयाकडून सकाळीच याबद्दल नगर पंचायत प्रशासनाला माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देझाड कोसळल्याचा परिणाम : उशिरा पोहोचले अहेरी नगर पंचायतीचे कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथील नवीन तहसील कार्यालय मार्गावरील वीज वितरण कंपनी कार्यालय परिसरात मुसळधार पावसाने मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड कोसळले. त्यामुळे अहेरी शहराचा वीजपुरवठा साडे चार तास खंडित होता व रस्त्यावरील वाहतूकसुद्धा बंद होती. परंतु रस्त्यावर कोसळलेले झाड उचलण्यासाठी नगर पंचायत कर्मचारी दोन तास उशिरा पोहोचले.आठवडाभरापासून जिल्हाभर काही ठिकाणी रिपरिप तर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. अहेरी उपविभागातही जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अहेरी शहरातील तहसील कार्यालय मार्गावर झाड कोसळले. अंतर्गत रस्त्यावरील पडलेले झाड उपचलण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची आहे. विद्युत कार्यालयाकडून सकाळीच याबद्दल नगर पंचायत प्रशासनाला माहिती देण्यात आली. मात्र तब्बल साडे चार तास कोणतेही कर्मचारी झाड हटवायला आले नाही. त्यामुळे अहेरीसह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा बंद होता आणि तहसील कार्यालय मार्गावरील वाहतूक बंद होती. यानंतर महावितरण कंपनी कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमित शेंडे यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन काही ठिकाणी फांद्या तोडून विद्युत पुरवठा सुरू केला तर नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजता येऊन झाड तोडण्याचे काम सुरू केले. या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला.दुर्गम भागात गंभीर स्थितीपावसाळ्याचे दिवस असल्याने अहेरी तालुक्यासह उपविभागातील अनेक गावांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होता. या भागात वेळीच विद्युत कर्मचारी पोहोचत नसल्याने दोन ते तीन दिवस नागरिकांना अंधारातच रात्री काढावी लागते. विशेष म्हणजे, अहेरी उपविभागातील विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे जरासा वादळवारा सुटल्यास वीज पुरवठा खंडित होते. वादळी पावसामुळे विद्युत लाईनवर झाडे कोसळल्यास बिघाड शोधताना विद्युत कर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागतात. अनेकदा दोन ते तीन दिवस बिघाड सापडत नाही. त्यामुळे दुर्गम भागात अनियमित वीज पुरवठ्याची गंभीर स्थिती पावसाळ्याच्या दिवसात पाहावयास मिळते. त्यामुळे विद्युत लाईन योग्यप्रकारे रस्त्याजवळून नेणे आवश्यक आहे.

टॅग्स :electricityवीजRainपाऊस