शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

भेंडाळा-अनखोडा मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST

भेंडाळा-अनखाेडा मार्गावर मोठमोठे खड्डे तर आहेतच शिवाय बारीक गिट्टी, चुरी, डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती बाहेर निघालेली आहे. रात्रीच्या सुमारास ...

भेंडाळा-अनखाेडा मार्गावर मोठमोठे खड्डे तर आहेतच शिवाय बारीक गिट्टी, चुरी, डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती बाहेर निघालेली आहे. रात्रीच्या सुमारास येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करीत अ आहेत. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे बुजविले हाेते. परंतु अल्पावधितच अवस्था ‘जैसे थे’ झाली. या परिसरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाल्याचे दिसून येत आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर बारीक डांबर उखडून गिट्टी रस्त्यात पसरली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांचे वाहन घसरण्याची भीती आहे. याचा त्रासही वाहनचालकांना होत आहे. परंतु रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासोबत या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी सुद्धा जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत, असा आराेप परिसरातील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, भेंडाळा-अनखोडा मार्ग हा अतिशय अरुंद मार्ग आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांसोबत लहान वाहनांना सुद्धा ये-जा करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.