पोलिसांनी ५ लाखांच्या दारूवर चालविला राेडराेलर

By गेापाल लाजुरकर | Updated: December 15, 2023 12:20 IST2023-12-15T12:19:36+5:302023-12-15T12:20:42+5:30

चामोर्शी पोलिस ठाण्याच्या वतीने अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबवण्यात येत आहे.

Police drove a raederaller on liquor worth 5 lakhs | पोलिसांनी ५ लाखांच्या दारूवर चालविला राेडराेलर

पोलिसांनी ५ लाखांच्या दारूवर चालविला राेडराेलर

गडचिराेली : चामोर्शी पोलिस ठाण्याच्यावतीने  वेळाेवेळी कारवाई करून पकडलेल्या एकूण ५ लाख रुपये किमतीच्या दारूसाठ्यावर बुधवारी राेडराेलर चालवून नष्ट करण्यात आला. 

चामोर्शी पोलिस ठाण्याच्या वतीने अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबवण्यात येत आहे. कारवाईदरम्यान पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आलेला पाच लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी बनावटीचा दारूचा मुद्देमाल नगरपंचायतीच्या  डम्पिंग यार्ड परिसरात नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक बसवराज हर्डीकर, पोलिस उपनिरीक्षक भावना राऊत, सहायक फौजदार मानकर यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक चंदन भगत उपस्थित होते.

Web Title: Police drove a raederaller on liquor worth 5 lakhs