'तो' माल गाडीतून उतरवित असतानाच पोलिसांनी गवसले ; आठ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक

By संजय तिपाले | Updated: October 10, 2025 16:53 IST2025-10-10T16:45:21+5:302025-10-10T16:53:44+5:30

देसाईगंजात कारवाई: आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

Police caught him while unloading goods from the car; One arrested with valuables worth eight lakhs | 'तो' माल गाडीतून उतरवित असतानाच पोलिसांनी गवसले ; आठ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक

Police caught him while unloading goods from the car; One arrested with valuables worth eight lakhs

गडचिरोली : शहरातील एका व्यापाऱ्याने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची गाडी बोलावली. मात्र, माल उतरवित असतानाच पोलिस धडकले अन् गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला. ही कारवाई ९ ऑक्टोबरला मध्यरात्री करण्यात आली. यावेळी एकास जागीच पकडले तर एक पळून गेला. एकूण तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून तब्बल सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
 
ललित गोपालदास राठी (रा. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) हा देसाईगंज परिसरात आपल्या चारचाकीतून सुगंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याच्या माहितीवरुन गुन्हे शाखेच्या पथकाने   कन्नमवार वाॅर्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी संशयास्पद गाडी दिसून आली. त्यातून  राज प्रोव्हिजन्स किराणा दुकाणासमोर थांबवून काहीतरी सामान उतरवित असल्याचे आढळले. छापा टाकताच एकजण वाहनाजवळील पिशवी टाकून पसार झाला; मात्र चालक ललित राठीला पोलिसांनी पकडले. पळून गेलेल्याचे नाव दुकानमालक इंद्रकुमार नागदेवे (रा. देसाईगंज) असल्याचे ललित राठीने सांगितले. हा माल रवी मोहनलाल खटवानी ( रा. गोंदिया ) याच्या मालकीचा असून त्याने विक्री करण्यासाठी  आपल्याकडे सोपविल्याची कबुलीही त्याने दिली. 

तिघांवर गुन्हा नोंद, दोघे फरार

दोन वेगवेगळ्या कंपनीचा प्रतिबंधित ३ लाख ३ हजार १५० रुपयांचा तंबाखू व तीन लाखांचे वाहन तसेच रोख २ लाख १९ हजार ६०० रुपये असा एकूण ८ लाख २२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. देसाईगंज ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी ललित राठी असून, इतर दोन आरोपी फरार आहेत.

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. भगतसिंग दुलत, अंमलदार राजू पंचफुलीवार व अंमलदार दीपक लोणारे यांनी कारवाई पार पाडली. तपास सहायक निरीक्षक प्रेमकुमार दांडेकर करीत आहेत.

Web Title : आठ लाख का गुटखा जब्त; उतारते समय एक गिरफ्तार।

Web Summary : गडचिरोली पुलिस ने 8.22 लाख रुपये का प्रतिबंधित सुगंधित तंबाकू जब्त किया। उतारते समय एक गिरफ्तार, दुकान मालिक सहित दो फरार। मामला दर्ज।

Web Title : Police seize Gutka worth ₹8 lakh; one arrested during unloading.

Web Summary : Gadchiroli police seized ₹8.22 lakh worth of banned scented tobacco. One arrested while unloading. Two others, including the shop owner, are absconding. Case registered.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.