शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

शेत नांगरणीचे भाडे पाेहाेचले ८०० रुपये प्रति तासवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST

शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतजमिनी नांगरणी करून ठेवत असतात. नांगरणी केलेली शेतजमीन पिकांसाठी लाभदायक असते. त्यामुळे शेतकरी शेतजमीन नांगरणी ...

शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतजमिनी नांगरणी करून ठेवत असतात. नांगरणी केलेली शेतजमीन पिकांसाठी लाभदायक असते. त्यामुळे शेतकरी शेतजमीन नांगरणी करीत असतात. सध्या शेतशिवात ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून येत आहेत. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात असत. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून शेतातील हंगामी स्वरूपात येणारी कामे ट्रॅक्टरने केली जात आहे. ट्रॅक्टरसुद्धा गावागावात दिसून येत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावात हंगामी स्वरूपात रोजगार उपलब्ध झाला आहे.

धान पिकासोबतच कपाशी पिकाची लागवडसुद्धा शेतकरी करीत असतात. मृगाचा अपेक्षित पाऊस झाला तर लागवड करणे सोयीचे होत असते. त्यामुळे कपाशी लागवड करणाऱ्या शेतजमिनीत नांगरणी केली जात आहे. दरवर्षी काही शेतकरी जमीन भाड्याने घेऊन शेती करीत होते. मात्र शेतीची मशागत, पीक लागवड, बी- बियाणे, कापणी, मळणी, खर्च वाढत चालला असल्याने भाड्याने शेतजमीन करण्यास शेतकरी कानाडोळा करीत आहेत.

मागील वर्षीपेक्षा डिझेलच्या दरात तब्बल २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसत चालला आहे.