रुग्णांसह कर्मचाऱ्यांनीही केला प्राणायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:57+5:30

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरची तालुक्यातील बोटेकसा व कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे तसेच बोटेकसा आरोग्य केंद्राअंतर्गत येणाºया बेडगाव, बेलगाव घाट, बेतकाठी, भीमपूर, बिहिटेकला आदी उपकेंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे.

Patients and staff also performed pranayama | रुग्णांसह कर्मचाऱ्यांनीही केला प्राणायाम

रुग्णांसह कर्मचाऱ्यांनीही केला प्राणायाम

ठळक मुद्देबोटेकसा आरोग्यवर्धिनी केंद्रात विविध आजारांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील बोटेकसा आरोग्यवर्धिनी केंद्रात योग व प्राणायाम शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनीही प्राणायाम करून सुदृढ आरोग्यासाठी नियमित प्राणायामाची आवश्यकता असल्याचे दाखवून दिले.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरची तालुक्यातील बोटेकसा व कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे तसेच बोटेकसा आरोग्य केंद्राअंतर्गत येणाºया बेडगाव, बेलगाव घाट, बेतकाठी, भीमपूर, बिहिटेकला आदी उपकेंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे. विविध आरोग्य सेवांसाठी प्रशिक्षण आरोग्य अधिकारी आरोग्यवर्धिनी केंद्रात एप्रिल २०१९ पासून नियुक्त करण्यात आले आहेत. सदर आरोग्य अधिकारी कर्करोग व रक्तदाब, मधुमेह तसेच ३० वर्षावरील व्यक्तीच्या आजाराची चाचणी करून त्यावर निदान करण्याचे प्राथमिस्तरावरील काम करीत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत सदर कार्यक्रम आखण्यात आला आहे. विविध आजार योग व प्राणायामच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बोटेकसा येथे आरोग्यवर्धिनी केंद्रात योग व प्राणायाम शिबिर घेण्यात आले. या शिबिरात योग शिक्षक संजय शिरपूरवार यांनी प्राणायामद्वारे विविध प्रकारचे विकार व योगाद्वारे आजार कशाप्रकारे दूर करता येतील, याबाबत मार्गदर्शन केले. बोटेकसाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण लेपसे यांनीही सुदृढ शरीरासाठी योग व प्राणायामाचे महत्त्व विशद केले. या शिबिरात गावातील नागरिकांसह रुग्ण, योग सादक व आरोग्य कर्मचारी सहभागी झाले. या सर्वांना सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यात आला.

Web Title: Patients and staff also performed pranayama

टॅग्स :Healthआरोग्य