गोंडवाना विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आदी संवर्गातील प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. जवळपास प्राध्यापकांची ३६ पदे भरली जात असताना यामध्ये ओबीसी संवर्गासाठी एकही पद राखीव असल्याचे दिसून येत नाही. ...
पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक ७३ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ५९, अहेरी तालुक्यातील ५७, सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा तालुक्यातील ३२ तर मुलचेरा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. ...
आरमोरी तालुक्याच्या शंकरनगर, पळसगाव, पाथरगोटा व सावलखेडा येथील नागरिकांनी लॉकडाऊनमुळे यावर्षीचा तेंदूपत्ता हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चार गावातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. ...
गावातील समविचारी १० ते ६० पर्यंत महिला-पुरुष एकत्र येऊन कापणी, बांधणी ही सर्व कामे सामूहिकरित्या करतात. हक्काचा असा रोजगार मिळवून देणारी अशी ही गुता पद्धत आहे. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून अत्याधुनिक कापणी, मळणी करणारे हार्वेस्टर यंत्र गावातल्या शेत ...
गडचिरोली जिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची अफवा आठ दिवसांपूर्वी पसरली. त्यानंतर प्रत्येक गावापासून शहरापर्यंत नागरिकांनी दुकानांमध्ये धाव घेऊन मिठाची खरेदी करण्यास सुरूवात केली. प्रत्येकजण केवळ मिठाचे पुडे खरेदी न करता संपूर्ण बॅग खरेदी क ...
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील कुलभट्टी येथे ट्रॅक्टर व बस यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बसचा काही भाग क्षतिग्रस्त झाला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली. ...
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गडचिरोली जिल्ह्यात मात्र अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. हीच स्थिती कायम राहावी यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. भामरागड येथे बाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवली जात आहे. तसेच शहरात विनाकारण फिरणाऱ्यांनाही तंबी ...
रबी हंगामातील विविध पिकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात सिंचन सुविधा निर्माण व्हावी तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील वाहत्या व प्रवाहीत नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यास पाण ...
लॉकडाऊनमुळे सध्या गावांतील भाजीबाजार बंद आहे. त्यामुळे अनेकांनी दुचाकीवरून गावांमध्ये घरोघरी जाऊन भाजी विकणे सुरू केले आहे. मुलचेरा तालुक्यातील श्रीरामपूर येथील सचिन बक्त हा इसमही दुचाकीवरून एटापल्ली तालुक्यातील गावांमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. ...
बुधवारी सकाळी ६ वाजतापासून पोलीस आणि मुक्तिपथ चमूने सर्वप्रथम बोथेडा गावाला लागून असलेला तलाव परिसर पिंजून काढला असता मोहसडवा भरून असलेले सहा ड्राम सापडले. हा सडवा तलावात टाकून नष्ट करण्यात आला. यानंतर मुरूमबोडी जंगल परिसरात तीन ठिकाणी ३९ ड्रम सडवा स ...