दोघांची भर, मात्र कोरोबाधितांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:01:06+5:30

दरम्यान गुरूवारी धानोरा येथे प्रथमच दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. परंतू ५ लोकांना सुटी झाल्यामुळे आता २३ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहे. पाच जणांना सुटी दिल्यानंतर त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते रुग्णालयाच्या आवारातच प्रदान करण्यात आले.

In addition to the two, however, the number of victims decreased | दोघांची भर, मात्र कोरोबाधितांची संख्या घटली

दोघांची भर, मात्र कोरोबाधितांची संख्या घटली

Next
ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिलासा : पाच पॉझिटिव्ह रुग्ण उपचारानंतर परतले घरी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या १० दिवसांपासून कोरोनामुळे दहशतीत असलेल्या जिल्हावासियांना गुरूवारी (दि.२८) काहीसा दिलासा मिळाला. सर्वप्रथम कोरोनाबाधित म्हणून दाखल झालेल्या कुरखेडा व चामोर्शी येथील पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. कोरोनाच्या आजारावर मात केल्यानंतर सुखरूपपणे त्यांना त्यांच्या गावी रवाना करताना अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करून चांगल्या आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान गुरूवारी धानोरा येथे प्रथमच दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. परंतू ५ लोकांना सुटी झाल्यामुळे आता २३ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहे. पाच जणांना सुटी दिल्यानंतर त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते रुग्णालयाच्या आवारातच प्रदान करण्यात आले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रूडे व इतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आजारातून बाहेर आलेल्या रूग्णांपैकी कुरखेडा येथील चार तर चामोर्शी येथील एका रु ग्णाचा समावेश होता. हे पाचही रु ग्ण त्यांच्या घरी रु ग्णवाहिकेने रवाना झाले. खबरदारी म्हणून त्यांना पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. सात दिवस आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरीच त्यांच्या लक्षणांबाबत निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत.
गेल्या १८ मे रोजी जिल्ह्यात पहिल्यांदा कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर सतत ही संख्या वाढत जाऊन २८ वर पोहोचली. आतापर्यंत बाधित रुग्णांमध्ये बहुतांश लोक तरुण वयाचे आहेत. त्यामुळे ते कोरोनावर मात करतील असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला.

जिल्ह्यात बाहेरून आलेल्या आपल्याच लोकांना कोरोना संसर्ग झालेला आहे आणि त्यातील रूग्ण बरे होण्यास सुरूवातही झाली आहे. नागरिकांनी न घाबरता बरे होवून गेलेल्या रूग्णांना स्विकारले पाहिजे. आता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे संसर्गाचा धोका राहिलेला नाही. जिल्ह्यातील उर्वरीत २३ रूग्णही लवकरच अशा प्रकारे बरे होवून आपापल्या घरी जातील, हा विश्वास आम्हाला आहे. - दीपक सिंगला, जिल्हाधिकारी

रु ग्णालयातून सोडण्यात आलेल्या सर्व रूग्णांना सॅनिटेशन किट व गृह विलगीकरणाच्या किट सोबत देण्यात आल्या आहते. त्यांना आता घरी खबरदारी म्हणून सात दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. त्यांची उपचारादरम्यान रु ग्णालयातील सर्व डॉक्टर इतर कर्मचाºयांनी चांगली काळजी घेतली. सर्व नागरिकांनी आता कोरोना रूग्णांशी नाही तर कोरोना आजाराशी लढाईच आहे. आपला जिल्हा पुन्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करूया.
- डॉ.अनिल रूडे, जिल्हा शल्य चिकित्सक

सर्वच रुग्णांचा उपचारांना प्रतिसाद
आता रुग्णालयात उपचार घेत असलेले सर्व २३ रु ग्ण दवाखान्यात उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्या जीवितास सध्यातरी कोणताही धोका नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित काही रुग्ण मृत्यूच्या दाढेत पोहोचले असले तरी गडचिरोली जिल्ह्यात तशी वेळ कोणावर येणार नाही याची काळजी आरोग्य विभाग घेत आहे. यात वृद्ध नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

Web Title: In addition to the two, however, the number of victims decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.